बाजार समिती बिनविरोध केली तशी केत्तूर ग्रामपंचायत ही सर्वांनी एकत्र येत बिनविरोध; कुणी केली मागणी?
वाचा सविस्तर!
केत्तूर प्रतिनिधी – सोलापूर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील १०९ ग्रामपंचायतीसह करमाळा तालुक्यातील सोळा ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडूक कार्यक्रम जाहीर केला असून यामध्ये केत्तूर ग्रा पं तीचा सामावेश आहे.सध्याची राज्यातील राजकीय परिस्थिती पहाता भापज-शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट,शिंदे गट या आगोदर काँग्रेस-राष्ट्रावादी-शिवसेना असे वेगवेगळे पक्ष गट यांची आघाडी-युती पहायला मिळत आहे.असे असताना करमाळा तालुक्यातील महत्त्वाची संस्था समजली जाणारी कृषी उत्पन्न बाजार समिती सर्व गटांनी मिळुन बिनविरोध केली.
करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील महत्वाची समजली जाणारी केत्तूर ग्रा पं सार्वत्रिक निवडणूक सर्व जणांनी बिनविरोध करावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते विजय येडे यांनी करमाळा-माढा न्यूज पोर्टल शी बोलताना केले.
भाव भावकीत होणारी खुन्नस मिटवण्यासाठी आर्थिक व प्रापंचिक हानी टाळण्यासाठी हिवरेबाजार,राळेगणसिध्दि,पाटोदा गावांचा आदर्श समोर ठेवून गावच्या विकासासाठी निवडणूक बिनविरोध होणे गरजेचे आहे.केत्तूर गावाला मोठ्ठी राजकीय परंपरा असून जुन्या केत्तूर मध्ये माजी आमदार व आदिनाथ साखर कारखान्याचे माजी चेअरमन कै.रावसाहेब भगवानराव पाटील यांच्या सुरवातीच्या गावपातळीच्या राजकारणात गावच्या उज्ज्वल भवितव्यासाठी माजी सैनिक व तत्कालीन विद्यामान सरपंच कै.साहेबराव सखाराम कानतोडे-पाटील यांनी केत्तूर ग्रा पं बिनविरोध करून कै.रावसाहेब पाटील यांना संधी दिली होती.
पुढे कै.रावसाहेब पाटील हे करमाळा पंचायत समितीचे सभापती झाले व त्यांनी उजनी धरण प्रकल्प ग्रस्तांसाठी चांगले काम करुन तालुक्याच्या आमदार पदाला गवसणी घातली.आदिनाथ साखर कारखान्याचे चेअरमन असताना पर्दशक कारभार करत शेतकरीयांना न्याय देण्याचे काम केले.
हेही वाचा – केत्तूर येथे स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत स्वच्छता मोहीम
ही उज्वल परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी गावातील सर्व जुन्या व नवीन कार्यकर्त्यांनी आणि महीला प्रतिनिधींनी पुढे येऊन केत्तूर ग्रा पं ची सार्वत्रिक निवडणूक बिनविरोध करावी.तसेच पुनर्वसीत गावठाण केत्तूर नं १ व केत्तूर नं २,श्री किर्तेश्वर देवस्थान येथील समस्या एकोप्याने सोडवण्यासाठी सर्वांनी गट-तट पक्ष विसरून एकत्र येऊन गावची निवडणूक बिनविरोध करावी असे आवाहन येडे यांनी केले.