क्रीडादेश/विदेशबार्शीसोलापूर जिल्हा

अभिमानास्पद! वेस्ट इंडिज लिजेंड संघाच्या प्रशिक्षकपदी बार्शीच्या ‘या’ मराठमोळ्या सुपुत्राची निवड

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

अभिमानास्पद! वेस्ट इंडिज लिजेंड संघाच्या प्रशिक्षकपदी बार्शीच्या ‘या’ मराठमोळ्या सुपुत्राची निवड

मुंबई – छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे पार पडलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज या आंतरराष्ट्रीय क्रिकेट टूर्नामेंटमधे सहा देश सहभागी झाले होते. या स्पर्धेत वेस्ट इंडिज संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी बार्शीपुत्र आनंद शेलार याने पार पाडली. त्यामुळे, बार्शीची आंतरराष्ट्रीय सरशी झाल्याचा बार्शीकरांना ‘आनंद’ आहे.

भारत, वेस्ट इंडिज, इंग्लंड, साऊथ आफ्रिका, श्रीलंका, बांग्लादेश या बलाढ्य संघांचा स्पर्धेत सहभाग होता. वाहन चालवताना नियमांचे पालन करून सुरक्षितता बाळगावी याचा संदेश देणार्‍या या सामन्यांमध्ये महान खेळाडू सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, केविन पीटरसन, दिलशान, जाँटी ह्रोडसॄ, खालीद महमूद, विरेंद्र सेहवाग, युवराज सिंह, मोहम्मद कैफ, सनथ जयसूर्या, रसेल अरनॉल्ड, टिनो बेस्ट, रिडले जेकॉब्स यांसारख्या खेळाडूंनी आपल्या अप्रतिम व आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले.

यापुढे ही सिरीज दरवर्षी घेण्यात येणार आहे. 20 दिवस चाललेल्या या साखळी सामन्यांमधे बार्शीच्या आनंद शेलार यांना टीम वेस्ट-इंडिज आणि ब्रायन लारा, dwayne Smith, Tino Best, Narsingh Deonarien, Ridley jecobs, Carl Hooper, Suleman Benn, Dinanath Ramnarien या महान खेळाडूंना प्रशिक्षण देण्याची संधी मिळाली.

या टूर्नामेंट चे उद्घाटन छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या हस्ते करण्यात आले. अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात कर्णधार सचिन तेंडुलकरच्या इंडिया Legends संघाने श्रीलंका Legends संघावर मात करत सीजन-1 ची ट्रॉफी आपल्या नावावर केली.

हेही वाचा- पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक : 11 जणांची माघार ‘इतके’ उमेदवार रिंगणात

कोरोनाच्या नियमावलीत शहरी व ग्रामीण असा भेदभाव; व्यापाऱ्यांना गृहीत धरून सत्ताधाऱ्यांनी केले चेंडू

मेहनत कामी आली

कठोर मेहनत अणि जिद्दीचा जोरावर बार्शीसारख्या ग्रामीण भागातील या युवकाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावली, ही बार्शीसाठी अभिमानास्पद बाब आहे. शेलार यांनी यश संपादन केलेल्या यशाचा, कर्तृत्वाचा सर्व स्तरांतून आनंद व्यक्त होत त्यांचे कौतुक केले जात आहे.

यांचं मार्गदर्शन लाभलं

आनंद शेलार यांना रवी गायकवाड (Chief of RTO, Mumbai) आणि त्यांचे बंधू प्रदीप गायकवाड व प्रशिक्षक उदय डोके यांचे मोलाचे सहकार्य आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभत आहे. या सर्वांच्या सहकार्यानेच आनंद शेलार यांनी संयम अणि शिस्तीने आपले क्रिकेट जगतातील स्वप्न सत्यात उतरवले. दरम्यान, मार्गदर्शक रवि गायकवाड (Chief Of RTO) यांचे आभार मानून आपल्या यशाचे श्रेयही त्यांनाच दिले.

पुढील लक्ष्य IPL

आनंद शेलार यांचे पुढचे ध्येय IPL सामन्यांचे असून त्यासाठी ते मोठी मेहनत घेत आहेत. उद्योजक गौतम कांकरिया यांनी मोफत Gym, जलतरण तलाव आणि मैदानही याआनंद यांस उपलब्ध करून दिले आहे. सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे सर्व पदाधिकारी, बार्शी तालुका क्रिकेट संघटनेचे सर्व पदाधिकारी, गौतम कांकरिया व आर. के. क्लब बार्शीचे सर्व सदस्य आणि विकास माने व बार्शी शहर पोलिस यांच्या वतीने अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छाही देण्यात आल्या.

litsbros

Comment here