बँकींग क्षेत्रातील बदलते ज्ञान व माहितीच्या देवाणघेवाणीसाठी प्रशिक्षण आवश्यक – चेअरमन अशोक लुणावत नागरी बँक्स असोसिएशनच्या वतीने कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळा

बँकींग क्षेत्रातील बदलते ज्ञान व माहितीच्या देवाणघेवाणीसाठी प्रशिक्षण आवश्यक – चेअरमन अशोक लुणावत

नागरी बँक्स असोसिएशनच्या वतीने कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळा

माढा/ प्रतिनिधी- आज बँकींग क्षेत्रात सातत्याने आमूलाग्र बदल होत असून भयंकर स्पर्धा निर्माण झाली आहे.नवनवीन माहिती व तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.रिझर्व्ह बँकेची गरजेनुसार ध्येयधोरणे बदलत आहेत.या सर्व बाबींची माहिती राष्ट्रीयीकृत बँकांप्रमाणे नागरी बँकेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना होणे आवश्यक आहे या उद्देशाने नागरी बँक्स असोसिएशनच्या वतीने दर महिन्याला प्रशिक्षणाचे आयोजन केले जात आहे त्यामुळे बँकीग क्षेत्रातील बदलत्या माहितीची व अनुभवाची देवाणघेवाण होते असे प्रतिपादन नागरी बँक्स असोसिएशनचे चेअरमन अशोक लुणावत यांनी केले आहे.

ते सोलापूर जिल्हा नागरी बँक्स असोसिएशनच्या वतीने जिल्ह्यातील विविध बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी आयोजित एक दिवसीय कार्यशाळेच्या शुभारंभाच्या वेळी बोलत होते.प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व परिचय संचालक दिपक मुनोत यांनी करून दिला.

पुढे चेअरमन अशोक लुणावत यांनी सांगितले की,एखाद्या बँकेला कामकाजाबाबत उल्लेखनीय यश मिळाले किंवा नेत्रदिपक प्रगतीमुळे पुरस्कार मिळाला तर पदाधिकारी व संचालकांचे भरपूर कौतुक होते त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांचेही कौतुक केले पाहिजे त्यामुळे त्यांची काम करण्याची उर्जा वाढते.कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम आणि ग्राहकांना सेवा दिली तर संस्थेची प्रगती होऊन चांगला नावलौकिक होतो.

यावेळी बँकिंग क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शक धनंजय वडापूरकर यांनी स्वयंशिस्त,सकारात्मक दृष्टिकोन व परिणाम आणि बँकेच्या प्रगतीतील सहभाग या विषयावर पहिल्या सत्रात मार्गदर्शन केले.दुसऱ्या सत्रात निवृत्त व्यवस्थापक गिरीश कुलकर्णी यांनी वेळेचे व्यवस्थापन,स्वयंप्रेरणा व दैनंदिन कामकाजावरील परिणाम या विषयावर कर्मचाऱ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले.

हेही वाचा – दहिगाव उपसा सिंचन योजना अनाधिकृत सायपन विरुद्ध कारवाईला अडथळा करणाऱ्या खडकेवाडी येथील एका विरुद्ध गुन्हा होणे

लाईट बिलाबाबत महत्वाची बातमी- इथून पुढे आता लाईटबिल येणार नाही, महावितरण देणार प्रीपेड मिटर, क्लिक करून वाचा सविस्तर

यावेळी संचालक राजगोपाल मणियार,सहव्यवस्थापक नंदकुमार दुड्डम यांच्यासह विविध बँकचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन मुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी ढवळे यांनी केले.आभार संचालक दिनकर देशमुख यांनी मानले.

फोटो ओळी – सोलापूर जिल्हा नागरी बँक्स असोसिएशनच्या वतीने आयोजित एक दिवसीय कार्यशाळेचा शुभारंभ करताना चेअरमन अशोक लुणावत, धनंजय वडापूरकर,गिरीश कुलकर्णी व इतर मान्यवर.

karmalamadhanews24: