क्राइमसोलापूर जिल्हा

बंदिस्त घरे/दुकाने फोडणारी सराईत गुन्हेगार टोळी जेरबंद,स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

बंदिस्त घरे/दुकाने फोडणारी सराईत गुन्हेगार टोळी जेरबंद,स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी

सोलापूर : सोलापूर जिल्हयातील उघडकीस न आलेल्या घरफोडी गुन्हंयाबाबत  पोलीस अधीक्षक, श्रीमती तेजस्वी सातपुते (भापोसे), सोलापूर ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी गुन्हे आढावा बैठकीत सदरचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत पोलीस निरीक्षक, सुहास जगताप, स्थानिक गुन्हे शाखा, यांना सुचना दिल्या होत्या.

या सुचना प्रमाणे पोलीस निरीक्षक, सुहास जगताप, स्था. गु. शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक, धनंजय पोरे व त्यांच्या पथकाला गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले. नमुद पथकाने सोलापूर ग्रामीण जिल्हयातील उघडकीस न आलेल्या घरफोडी व चोरीच्या गुन्हयावर लक्ष केंद्रीत करून गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषनाच्या सहयाने आरोपी निष्पन्न करण्यास सुरुवात केली.

माळशिरस पोलीस ठाणे गुरनं २६७/२०२२ भादंवि क. ३८०, ४५७, ३४ हा गुन्हा दिनांक २९/०४/२०२२
रोजी दाखल आहे. नमुद गुन्हयातील तक्रारदार यांचे बंद घराचे खिडकीचे ग्रील उचकटुन अज्ञात आरोपीत यांनी
४,६७,०००/- रू. किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले होते.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नमुद गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेत असताना गुन्हयातील
आरोपी हे पंढरपूर तालुक्यातील खेडभोसे येथे येणार असल्याची गोपनिय माहिती प्राप्त झाली. सदर माहितीच्या अनुषंगाने स्था. गु. शाखेकडील सपोनि धनंजय पोरे व त्यांचे पथकाने सापळा रचुन दोन आरोपीत यांना खेडभोसे ता.पंढरपूर येथुन ताब्यात घेतले.

या गुन्हयातील सहभागा बाबत आरोपीत यांनी कबुली दिली असुन त्यांच्याकडे केलेल्या सखोल व कौशल्यपुर्ण तपासाअंती आरोपीतांनी त्यांचे अन्य तीन साथीदारा सोबत जिल्हयातील अनेक भागात बंदिस्त घरे / दुकाने यांचे दरवाज्याचे कोयंडे तोडुन, खिडकीचे ग्रील उचकटुन, कापुन घरफोडी व चोरी केली असल्याचे सांगितले.अटक आरोपीत यांचेकडे केलेल्या कौशल्यपुर्ण तपासामुळे जिल्हयातील पोलीस ठाण्यास दाखल  गुन्हे आरोपीत यांनी त्यांचे अन्य साथीदारा समवेत केले असल्याची कबुली दिली आहे.

अटक आरोपीत यांचेकडुन वरील प्रमाणे एकुण २१ घरफोडीचे गुन्हे व २ मोटार सायकल चोरीचे गुन्हे
उघडकीस आले आहेत. आरोपी यांचेकडुन नमुद सर्व गुन्हयातील ४०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकुण
१५,६१,६००/- रू. किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

हेही वाचा – प्रख्यात साहित्यिक, प्रा.राजेंद्र दास यांना यंदाचा ‘करमाळा भूषण’ पुरस्कार जाहीर; ग्रामसुधार समितीने केले पुरस्काराचे आयोजन

सोलापूर जिल्ह्यात वाढली वीजचोरी; विजचोरीत ‘हा’ तालुका टॉप, विजचोरांना पकडण्यासाठी पथके तैनात

ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती. तेजस्वी सातपुते (भापोसे),अपर पोलीस अधीक्षक श्री. हिम्मत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांचे नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, यांचे पथकातील पोलीस उपनिरीक्षक राजेश गायकवाड, सहा.पोलीस उपनिरीक्षक / बिराजी पारेकर, श्रीकांत गायकवाड, पोहेकॉ/सलीम बागवान, आबासाहेब मुंढे,विजयकुमार भरले, हरिदास पांढरे, पोना / रवि माने, मपोहेकॉ / मोहिनीभोगे,मपोना / अनिसा शेख, पोना/ व्यंकटेश मोरे सायबर सेल तसेच अंगुली मुद्रा विभागाचे सपोनि / गळवे, पोहेकॉ/सादुल,पोकॉ/ छत्रे यांनी बजावली आहे.

litsbros

Comment here