करमाळाधार्मिक

कोरोनामुळे आवाटी येथील वली चांद पाशा दर्गा मध्ये उर्स मुबारक चा धार्मिक कार्यक्रम साध्या पद्धतीने साजरा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

कोरोनामुळे आवाटी येथील वली चांद पाशा दर्गा मध्ये उर्स मुबारक चा धार्मिक कार्यक्रम साध्या पद्धतीने साजरा

जेउर (प्रतिनिधी) : करमाळा तालुक्यातील आवाटी येथील प्रसिद्ध असे वली चांद पाशा दर्गा मध्ये प्रतिवर्षी हजरत बु अली शहा कलंदर पानिपत रहमानी यांचा उर्स मुबारक चा धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतो मात्र यावर्षी कोरूना च्या पार्श्वभूमीवर सदर चा उरूस मुबारक चा धार्मिक कार्यक्रम अत्यंत साध्या पद्धतीने मोजक्याच भाविकांमध्ये साजरा करण्यात आल्याची माहिती वली चांद पाशा दर्गा ट्रस्ट समितीचे अध्यक्ष हाजी कादरभाई तांबोळी तसेच वली बाबा चे खादिम गुलाम नबी कादरी व इरफान कादरी यांनी बोलताना दिली.

याबाबत अधिक माहिती देताना श्री तांबोळी पुढे बोलताना म्हणाले की सध्या कोरूना च्या पार्श्वभूमीवर हजरत बु अली शाह कलंदरी पानिपती रहमानी यांचा उर्स मुबारक चा कार्यक्रम आज दिनांक 23 मे रोजी अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.

हेही वाचा- ‘पंढरपूरचा पराभव आणि उजनीचे पाणी’ हे दोन्ही धक्के आमदार शिंदे यांच्या चांगलेच जिव्हारी लागलेले दिसतात..

सकारात्मक बातमी; करमाळा तालुक्यातील ‘या’ गावात आजपर्यंत एकही कोरोना रुग्ण नाही; सर्वत्र होत आहे कौतुक

यावेळी दर्गा मध्ये उरूस मुबारक निमित्त फातिहा खानी व चादर अर्पण धार्मिक कार्यक्रम छोटेखानी पद्धतीने साजरा करण्यात आला सदरचा धार्मिक कार्यक्रम प्रत्येक वर्षी मोठ्या भक्तिमय वातावरणात असंख्य भक्त गणांच्या उपस्थितांमध्ये साजरा केला जातो मात्र या वेळेस कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सदर चा उरूस मुबारक चा कार्यक्रम अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला .


हजरत बु अली शहा कलंदर पानिपत रहमानी यांच्या यादगार उरूस मुबारक निमित्त दरवर्षी दर्गा मध्ये मोठे धार्मिक कार्यक्रम होतात राज्यभरातील अनेक लाखो भक्त या ठिकाणी उरूस मुबारक च्या कार्यक्रमासाठी येत असतात मात्र यावेळी कोरोनाच्या प्रादुर्भाव पाहता दर्गा परिसरात कमालीचा शुकशुकाट जाणवत होता.

हेही वाचा- मॉर्निंग वॉक करणाऱ्या हायस्कूल शिपायाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जागीच मृत्यू; करमाळा तालुक्यातील घटना

करमाळा येथे झालेल्या अनैतिक संबंधातून खून प्रकरणी एकास जामीन

पण यंदा कोरूना मुळे सदर चा दर्गा भाविकासाठी बंद करण्यात आला होता यावेळी राज्यातील तसेच परराज्यातील भक्तगण दर्शनासाठी दर्गा परिसरात येऊ नये म्हणून बार्शी येथील मोरे सिक्युरिटीज ने मोठा बंदोबस्त ठेवला होता
एकंदर पाहता महामारी कोरूना मुळे आवाटी येथील वली बाबा दर्गा मध्ये उरूस मुबारक चा कार्यक्रम मोजक्याच भक्तगणांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला.

litsbros

Comment here