करमाळा

आवाटी येथील जुन्या पिढीतील नामवंत मल्ल जुम्मा खान पठाण यांचे निधन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

आवाटी येथील जुन्या पिढीतील नामवंत मल्ल जुम्मा खान पठाण यांचे निधन

करमाळा( प्रतिनिधी); आवाटी तालुका करमाळा येथील जुन्या पिढीतील नामवंत मल्ल तसेच माजी आमदार स्वतंत्र सैनिक कैलासवासी नामदेवराव जगताप यांचे विश्वासू सहकारी पैलवान जुम्मा खान समशेर खान पठाण वय 90 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

आवाटी येथील हजरत वली चांद पाशा दर्गाचे खादिम( शिष्य) नबीखा पठाण यांचे ते वडील तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक नसरुल्लाह खान यांचे ते चुलते तर पत्रकार अलीम शेख यांचे ते मामा होत.

त्यांच्या मागे पत्नी चार मुले दोन मुली सुना नातवंडे पणतू असा मोठा परिवार आहे त्यांच्या निधनाने माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी दुःख व्यक्त केले आहे.

हेही वाचा- सकारात्मक बातमी; जगदीशब्द फाउंडेशनचा विधायक उपक्रम; कोरोनाने पालक गमावलेल्या सोगाव येथील बालकांचे घेतले शैक्षणिक पालकत्व

करमाळा एसटी स्टँड समोर ‘या’ मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आज करणार आक्रोश आंदोलन

पैलवान जुम्मा खान पठाण यांच्यावर त्यांच्या राहत्या गावी आवाटी येथे मुस्लीम रीतिरिवाजाप्रमाणे अंत्यविधी करण्यात आला त्यांच्या अंत्ययात्रेला युवा नेते शंभुराजे जगताप बार्शी चे नगराध्यक्ष एडवोकेट आसिफ तांबोळी माजी नगराध्यक्ष हाजी कादरभाई तांबोळी

खालीद काजी सहाब परांडा चे नगरसेवक अब्बास भाई मुजावर माजी नगरसेवक शब्बीर भाई पठाण एडवोकेट नूरुद्दीन चौधरी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच निकटवर्तीय नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते

litsbros

Comment here