नारायण आबा पाटील यांच्या विजयाने करमाळा तालुक्यात उत्साहाचे वातावरण

नारायण आबा पाटील यांच्या विजयाने करमाळा तालुक्यात उत्साहाचे वातावरण

केत्तुर – अवघ्या महाराष्ट्रात महायुतीची लाट असताना मोहिते पाटीलांच्या बालेकिल्ल्यात मात्र नारायण आबा पाटील यांची तुतारी गरजल्याने करमाळा तालुक्यात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले,रखडलेली दहीगाव उपसा सिंचन योजना मार्गी लागेल यामुळे पूर्व भागातील शेतकरी तर ऐन उन्हाळ्यात उजनी जलाशयकाठच्या शेतकऱ्यांची पाणी आणि विजेची समस्येची तीव्रता कमी होण्याची शक्यताने पश्चिम भागातील शेतकरी सुखावले असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.

तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्याची झालेली दुरवस्था दूर होण्याची अपेक्षा या भागातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे.महाराष्ट्रात सर्वाधिक केळी उत्पादित करण्याचा विक्रम जळगावच्या नावावर होता तो मान करमाळा तालुक्याला मिळवून देणाऱ्या कंदर व केत्तुर भागातील शेतकऱ्यांना केळी विकास केंद्राची स्थापना झाली तर त्याचा नक्कीच फायदा होईल.

हेही वाचा – खतरनाक फ्रॉड..! तुमच्याच बँक खात्यात पैसे पाठवून अशा प्रकारे तुमचीही होऊ शकते फसवणूक!

श्री नंदिकेश्वर विद्यालय उपळाई बुद्रुकचे पुणे विभागीय मैदानी स्पर्धेत यश

दळणवळणाच्या दृष्टीने दुर्लक्षित समजला जाणाऱ्या तालुक्यातील पश्चिम भागात २०१४-१९ कार्यकाळात केत्तुर व पोमलवाडी पुलाबरोबरच रस्त्यांची जी कामे झाली होती त्यानंतर ठोस अशी कामे झाली नसल्याने त्याचा अनुशेष या कार्यकाळात भरून निघण्याची आशा आहे,सबका साथ सबका विकास हे ब्रीद असणाऱ्या भाजप शासनाच्या कार्यकाळात राज्यातील कोणत्याही मतदारसंघावर अन्याय होणार नाही याची आम्हाला खात्री आहे.
– सचिन जरांडे
ग्रामस्थ , केत्तुर

karmalamadhanews24: