ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुरस्थिती,कोरोनामुळे देता न आलेल्यांना पुन्हा देता येणार अंतिम वर्षाची परीक्षा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

पुरस्थिती,कोरोनामुळे देता न आलेल्यांना पुन्हा देता येणार अंतिम वर्षाची परीक्षा

मुंबई : सध्या राज्यात विविध विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरु आहेत.अतिवृष्टि आलेला पूर तसेच कोरोनामुळे यामुळे अनेकांना काही पेपर्स देताआले नाहीत.अशा विद्यार्थ्यांची १० नोव्हेंबरपूर्वी पुन्हा परीक्षा घेणार
असल्याची माहिती उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

 याचबरोबर जे सीईटी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांनाही पुन्हा एक संधी दिली जाणार आहे.शुक्रवारी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या बैठकी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंत्री सामंत यांनी पत्रकार परीषदेत दिली.

ऑनलाईन परीक्षांसाठी ज्या कंपन्यांची निवड केली होती. मात्र परीक्षा योग्य पद्धतीने पार पडल्या नाहीत अशा सर्व कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.सामंत म्हणाले, एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल.सोलापूर,मुंबई, पुणे, अमरावती विद्यापीठात विद्यार्थ्यांना अडचणींना समोरे जावं लागलं ही बाब लक्षात आली आहे.

हेही वाचा – बिहार विधानसभा निवडणुकीत रामदास आठवलेंच्या रिपाईचे ‘इतके’ उमेदवार रिंगणात; उर्वरित जागांवर ‘या’ पक्षाला पाठिंबा

सोलापूर- विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा पूर्ण; 99.86 टक्के विद्यार्थ्यांनी दिली ऑनलाइन परीक्षा; ‘या’ तारखे पर्यंत लागणार निकाल

काही प्रमाणात आढावा घेताना कळलं की परीक्षा घेताना त्रुटी राहिल्यात. पूरपरिस्थिती, कोव्हीडमुळे आणि तांत्रिक अडचणीमुळे ज्यांना अंतिम वर्षाच्या परीक्षा देता आल्या नाहीत, त्या विद्यार्थ्यांच्या १० नोव्हेंबर पूर्वी पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहेत. त्यांचे निकाल सुद्धा लवकरात लवकर जाहीर होतील, असेही सामंत म्हणाले.विद्यापीठ परीक्षा हाणून पाडण्यासाठी सायबर हल्ला झाला का याचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. परीक्षा योग्य पद्धतीने का होऊ शकल्या नाहीत.यासाठी ४ सदस्यांची समिती नेमण्यात आली आहे. १० नोव्हेंबरपासून ही
समिती काम करणार आहे. सीईटी परीक्षा तालुका स्तरावर कशी करता येईल याविषयी तयारी सुरू केली आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

litsbros

Comment here