आठवडे बाजारात शुकशुकाट

*आठवडे बाजारात शुकशुकाट*

केत्तूर ( अभय माने) केत्तूर (ता.करमाळा)येथील शनिवारच्या आठवडे बाजारात ग्राहकांनी पाठ फिरल्याचे दिसून आले. त्यामुळे व्यापाऱ्यांना ग्राहकांची वाट पाहण्याची वेळ आली होती. महाशिवरात्रीनंतरचा हा पहिलाच आठवडे बाजार त्यातच वाढती उष्णता यामुळे बाजारात कमी प्रमाणात वर्दळ दिसून येत होती. परिसरातील ऊसतोड हंगाम संपल्याने ऊसतोड मजुरांची वर्दळ कमी झाली आहे. त्याचाही आठवडे बाजार परिणाम झाला आहे. बाजारात ग्राहकांची वर्दळ कमी असली तरी, भाजीपाल्याच्या दरातही घसरण झाली होती.

हेही वाचा – करमाळा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेची नुतन कार्यकारणी जाहिर- दिनेश मडके

विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे व माजी आमदार जयवंतराव जगताप यांची भेट

कांदा, बटाटा – 30 रुपये किलो,भेंडी, फ्लावर, हिरवा वाटाणा- 40 रुपये किलो, टोमॅटो,काकडी- 20 रुपये किलो,ढोबळी मिरची, हिरवी मिरची,दोडका -60 रुपये किलो, शेवगा शेंग – 60 रूपये किलो, कोथिंबीर,मेथी -05 रुपये पेंडी, लसुन 100 रुपये किलो. असे बाजारभाव होते.

छायाचित्र :केत्तूर-आठवडे बाजारात ग्राहकाची वाट पाहताना विक्रेते

 

karmalamadhanews24: