कोणत्याही पिकास ठिबक सिंचन आवश्यक- विजय बालगुडे

कोणत्याही पिकास ठिबक सिंचन आवश्यक- विजय बालगुडे

केत्तूर (अभय माने) बॅक ऑफ महाराष्ट्र ग्रामीण विकास केंद्र भिगवण आयोजित एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम मौजे हिंगणी (ता.करमाळा ) येथे ऊस पिक तंत्रज्ञान व ठिबक सिंचन या विषयावर घेण्यात आला होता प्रमुख मार्गदर्शक विजय बालगुडे प्रभारी अधिकारी उमेश निकम देवा फलफले सरपंच संतोष बाबर हे उपस्थित होते.

शेतकरी आता विविध पिक ऊस शेती बरोबर केळी फळबाग भाजीपाला यांची लागवड वाढवत आहे, सर्व पिकास ठिबक सिंचन करणे, माती परीक्षण करून खत देणे, आवश्यक आहे, तरूणांनी नोकरीच्या शोधात न जाता चांगले तंत्रज्ञान वापरून शेती करणे गरजेचे आहे, शेती बरोबरच इतर शेतीपूरक व्यवसाय करणे आवश्यक आहे, असे मत विजय बालगुडे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा – राजवर्धन गुंडने केली कष्टातून स्वतःबरोबरच कुटुंबीयांची स्वप्नपूर्ती – विनोद परिचारक शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी ; जशी खाण तशी माती जणू याचाच प्रत्यय

कावळवाडी गावचे माजी सरपंच अनिल शेजाळ यांच्या मातोश्रींचे निधन

उमेश निकम यांनी बॅक ऑफ महाराष्ट्राच्या विविध कर्ज योजना तसेच ग्रामीण विकास केंद्राच्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमासंदर्भात मार्गदर्शक केले देवा फलफले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले तर भाऊसाहेब बाबर यांनी आभार मानले प्रशिक्षण कार्यक्रमास गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

karmalamadhanews24: