करमाळासोलापूर जिल्हा

अनुसूचित जाती-जमातीच्या महिला, मुलींवर होणारे अन्याय अत्याचार रोखण्यास सरकार अपयशी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

अनुसूचित जाती-जमातीच्या महिला, मुलींवर होणारे अन्याय अत्याचार रोखण्यास सरकार अपयशी

करमाळा(सुनिल भोसले);
महाराष्ट्रात अनुसूचित जाती जमातीच्या लोकांनवर अन्याय अत्याचार तसेच महिला व मुलींची छेडछाड, विनयभंग, बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत.ते रोखण्यासाठी
सरकार मात्र अपयशी ठरत आहे, असे भीम आर्मीचे महाराष्ट्र राज्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे करमाळा माढा न्यूजशी बोलताना म्हणाले की,
महाराष्ट्रात अनुसूचित जाती जमातीच्या लोकांचे खुन पाडले जात आहेत. महिला ,मुलींची छेड काढली जात आहे , बलात्कार केले जातात प्रशासनाला त्याचे गांभीर्य नाही.

राजकीय पुढारी उच्च वर्णीय लोकांच्या विषयावर आवाज उठवत असुन धनदांडग्याना वेगळी आणी सर्व सामान्य लोकांना वेगळी वागणूक देत आहेत. पिडीतांची जात- पात बघून निषेधाची तीव्रता ठरवली जाते हा कसला पुरोगामी महाराष्ट्र आहे??

यावेळी अक्षय धावारे विनोद कोल्हे , विलास आण्णा चक्रे , सुभाष बनसोडे, शरद बनसोडे , कार्तिक गायकवाड, अमर गुरव , शिवाजी लांडगे , बबलु गवळी , अमीत कांबळे संदीप कांबळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा-एसटी बस सवलतीचे स्मार्टकार्ड मिळवण्याला ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ; करमाळा आगारच्या व्यवस्थापक अश्विनी किरगत यांची माहिती

बारामती अँग्रोला श्री.आदिनाथ साखर कारखाना भाडेतत्त्वावर 15 वर्षे की 25 वर्षे.? संचालक मंडळात धुसफूस

अनुसूचित जाती जमाती च्या समाजातील सर्व खटले जलदगती न्यायालयात चालवून निकाल दिले.तर आरोपींना कायद्याचा धाक राहील.असे उत्तरेश्वर कांबळे म्हणाले..

litsbros

Comment here