करमाळा शैक्षणिक सोलापूर जिल्हा

आठवण शाळेची….उत्सव मैत्रीचा.. तब्बल 38 वर्षांनी आले माजी विद्यार्थी एकत्र. 2009 पासुन विद्यार्थ्यांची छडी बंद झाली त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

आठवण शाळेची….उत्सव मैत्रीचा.. तब्बल 38 वर्षांनी आले माजी विद्यार्थी एकत्र.

2009 पासुन विद्यार्थ्यांची छडी बंद झाली त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान 

केत्तूर (अभय माने) च्या नेताजी सुभाष विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मेळावा रंगला.एस.एस.सी मार्च 1987 बॅच मधील इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा तब्बल 38 वर्षांनी एकामेकांचे बदललेले चेहरे राहणीमान आणि प्रत्येकाचीच वेगळीच बोलीभाषा यांचे निरीक्षण करीत तब्बल अडवतिस वर्षांनंतर एकत्र आलेल्या वर्ग मित्रांच्या मैत्रीणीच्या बालपणातील आठवणीने डोळे आंनंद अश्रुने भरुन आले होते.

नेताजी सुभाष केतुर- 2 येथील 1986/87 या दहावीच्या परीक्षेनंतर वेगवेगळ्या क्षेत्रात स्थायिक झाले, कोणी उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी गेले तर कोणी स्वताच्या व्यवसायात सक्रिय झाले. त्याकाळात मोबाईल नुकताच जरा जोर बांधत बाजारात उपलब्ध झाले होते म्हणून आम्ही फक्त मोबाईल वरून आपल्या मित्रांना विचारपुस करत होतो.

आयुष्य यशस्वी घडवायचे असेल तर कठोर मेहनत, अंगात जिद्द आणि त्यासाठी समोर ध्येय ठेवत आपला टप्पा गाठायचा असतो. मनातील जिद्द परिस्थितीवर मात करीत जो यशस्वी ठरतो. तोच ज्ञानाच्या सर्वोच्च शिखरावर जातो. किती मोठ्या पदावर गेलात तरी ज्यांनी जन्म दिला ते आई-वडील आणि ज्यांनी कर्म शिकवले त्या शाळेस व शिक्षकांना कधीच विसरायचे नाही ही खूणगाठ नक्की बांधा असे प्रतिपादन जेष्ठ माजी प्राचार्य काशिनाथ जाधव यांनी केले. ते माजी विद्यार्थी आयोजित सन्मान सोहळ्यात बोलत होते. सन 1987 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी 38 वर्षांनी गुरू-शिष्य स्नेह भेट आणि सन्मान सोहळा पार पाडला.

यावेळी बोलताना जेष्ठ शिक्षक आजिनाथ सातव म्हणाले की, यशस्वी विद्यार्थी अध्ययन केलेल्या शिक्षकांची गुरुदक्षिणा ठरते. शिक्षक कधीच विद्यार्थ्यांना दुजाभाव करीत नाही. जे तो आपल्या बौद्धिक क्षमतेने आपल्या क्षेत्रात उज्वल ठरतो. आजदेखील आमच्यासाठी कोणी उच्चशिक्षित, नोकरदार, उद्योजक किंवा कोणी साधा दुकानदार आहे हे महत्त्वाचं नसून तो आम्ही घडवलेला विद्यार्थींच आहे असे मानतो. जबाबदारी-संसाराने सगळे दूर गेलेले तुम्ही भेट घडवली यासारखे दुसरे समाधान नाही.

विद्यार्थींनी सोनं होण्यापेक्षा परिस झाले पाहिजे. नक्कीच आपण यशाच्या शिखरापर्यंत पोहचल्या शिवाय राहणार नाहीत.असे मत भरत पांडव यांनी व्यक्त केले.

या प्रसंगी माजी शिक्षक प्रभाकर कांबळे, जया कांबळे, वसंत बिडवे, आजिनाथ सातव, सुनिता भोसले/सातव, गोरख कोठावळे, शशिकांत क्षीरसागर, दत्तात्रय सोनवणे ,शहाजी भोसले, भारत पांडव यांचेसह नेताजी सुभाष विद्यालयाचे विद्यमान प्राचार्य काशिनाथ जाधव, पर्यवेक्षक भीमराव बुरटे, किशोर जाधवर, संग्राम जाधव उपस्थित होते.

यावेळी सन 1986/87 सालीचे अनेक मित्र खूप वर्षांनी एकमेकांना भेटल्याने खूप आनंदित झाले होते. तर काही भावनिक झाले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नेताजी सुभाष विद्यालयातील बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले व सरस्वती पूजन करण्यात आले.त्यानंतर शाळेतील प्रार्थना करुन राष्ट्रगीत म्हणण्यात आले.या विद्यार्थ्यांकडून शाळेला मदत म्हणून कलर प्रिंटर व भारत मातेची मूर्ती भेट देण्यात आली.

विद्यार्थ्यांची एकत्रित मूठ बांधण्यासाठी विलास खुळे, देवराव चव्हाण, राजाराम माने, महेश निसळ,संगीता सोलापूरे/शेटे यांनी अखेरपर्यंत खिंड लढवली.आणि त्याचे यश म्हणून जवळजवळ 95 टक्के विद्यार्थी विद्यार्थ्यांनी व माजी शिक्षक या स्नेह संमेलनात सहभागी झाले होते.

या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन तात्या गावडे,उद्धव खोटे यांनी केले.आभार प्रदर्शन अरुण मगर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम ने करण्यात आली.

” फेसबुक, व्हाट्सअप आदि सोशल मीडियाच्या दुनियेत प्रत्यक्ष भेट दुर्मिळ झाली असताना, स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने तब्बल 38 वर्षांनी वर्गमित्र मैत्रिणींना भेटण्याचे समाधान मिळाले. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
– तिलोत्तमा जाधव /काळे, सविता पांढरे/हांडे

हेही वाचा – शिवाजी तळेकर हे उत्तम प्रशासक व विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापक – आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड 37 वर्षीय सेवेनंतर निवृत्त झाल्याबद्दल विद्यार्थी व शिक्षकांनी केला सत्कार

पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या मुळे कोळगाव सबस्टेशनचा प्रश्न मार्गी – गणेश चिवटे

” गेट-टुगेदर म्हणजे जीवनातील एक अनमोल क्षण आपल्याला आनंद व मोठ्या आठवणी देऊन जातो. रोजच्या गडबडीत व धावपळीत हरवून गेलेल्या आठवणींना पुन्हा नव्याने उजाळा देत सर्व माजी विद्यार्थी स्नेहसंमेलनाचे एकत्र आले आहेत. स्नेहसंमेलन म्हणजे आनंद, अनुभव आणि स्मित यांची देवाण-घेवाण करणे होय.
-सुलोचना बाबर /जाधव, कुसुम खाटमोडे /चव्हाण

litsbros

About the author

karmalamadhanews24

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!