*अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्या पुनरागमनानिमित्त आनंदोत्सव*
केत्तूर (अभय माने) भारतीय वंशाच्या नासा अंतराळवीर सुनीता विल्यम्स व त्यांचे सहकारी बूच विल्मर यांनी 286 (9 महिने) दिवसाच्या व 17 तासांच्या आजवरच्या सर्वात अवघड व महागड्या अंतराळ प्रवासानंतर बुधवार (ता.19) रोजी पहाटे 3.27 मिनिटांनी फ्लोरिडाच्या समुद्रात सुरक्षित पृथ्वीवर यशस्वीपणे पुनरागमन केल्याबद्दल केत्तूर (ता. करमाळा) येथील नेताजी सुभाष विद्यालयामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य. प्रदेश उपाध्यक्ष पदी ” नमिता थिटे” यांची पुनश्च एकदा निवड
यावेळी प्राचार्य काशिनाथ जाधव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या सुनिता विल्यम्स यांच्या अवकाशातील प्रेरणादायी यशस्वी प्रवासाची चर्चा झाली. यावेळी प्रशालेमधील सर्व शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी सर्वप्रथम थोर शास्त्रज्ञ राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाची प्रास्ताविक प्रा.किशोर जाधवर यांनी केले तर आभार रामचंद्र मदने यांनी मानले.