अंजनगाव खेलोबा ग्रामपंचायतीच्या वतीने लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांना जयंती निमित्त अभिवादन
माढा प्रतिनिधी –
1 ऑगस्ट रोजी कथा,कादंबरी, लोकनाट्य,नाटक,पटकथा,लावणी, पोवाडे, प्रवासवर्णन अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतील लेखन केलेले ख्यातनाम मराठी साहित्यिक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104 वी जयंती माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे मोठया उत्सवात साजरी करण्यात आली.
अंजनगाव खेलोबा ग्रामपंचायतीच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी गावच्या महिला सरपंच अरुणाताई प्रदीप चौगुले यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.याच बरोबर गावातील ABS ग्रुपच्या वतीनेही अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले.
जयंती विशेष लेख | साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे: बंडखोर आणि परिवर्तनाची बीजं पेरणारा साहित्यिक!
राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सज्जनराव जाधव, युवा नेते प्रदीप (भैय्या) चौगुले, माढा तालुका सोशल मीडिया चे अध्यक्ष विनायक चौगुले, ग्रा.प. सदस्या मनीषा वाघमोडे माजी ग्रा.प. सदस्य हिराचंद रावडे,छगन गायकवाड,रमेश गायकवाड, शरद गायकवाड,नागेश पाटोळे, सतीश गायकवाड योगेश पाटोळे, मारुती गायकवाड, आत्माराम गायकवाड,बिरूदेव वाघमोडे,गोटूदादा नाईक,नितीन भडकवाड, सज्जन शिंदे,शंकर गायकवाड तसेच ABS ग्रुप चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.