माढासोलापूर जिल्हा

अंजनगाव खेलोबा येथे दलित महासंघ शाखेच्या उद्घाटन सोहळा संपन्न

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

अंजनगाव खेलोबा येथे दलित महासंघ शाखेच्या उद्घाटन सोहळा संपन्न

माढा प्रतिनिधी:३२ वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या दलित महासंघाची शाखा माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे काढण्यात आली. या शाखेचे उद्घाटन दलित महासंघाचे संस्थापक तसेच अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष प्रा.डॉ.मच्छिंद्र सकटे यांच्या हस्ते करण्यात आले.

महात्मा फुले,शाहू महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांशी सहमत असलेली,समाजाच्या अडचणी प्रश्न सोडवणारी,जात-पात न पाहता प्रत्येक माणसाचे प्रश्न सोडवणारी, संघटना म्हणजे दलित महासंघ होय्. या संघटनेची स्थापना ३२ वर्षांपूर्वी म्हणजेच ५ जुलै १९९२ साली कोल्हापुरात प्राध्यापक मच्छिंद्र सकटे यांनी केली.

या कार्यक्रमाच्या वेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनील अवघडे यांनी आपल्या मनोगतातून अंधश्रद्धेवर ताशेरे ओढले.अंधशरदधेलान् कोणी बळी न पडता आपल्या मुलांना शिक्षण दिले पाहिजे असे ते म्हणाले.यावेळी अनेक उदाहरणे त्यांनी दिली.आपल्यापर्यंत शासकीय योजना कशा पोहोचेल हे पाहणे गरजेचे आहे.घर नसणार्‍यांसाठी रमाई योजना कशी उपयुक्त ठरेल याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी उपस्थित असलेले संभाजी महाराज संभाजी ब्रिगेडचे दिनेश जगदाळे यांनी आपल्या विचारातून सर्व समाज बांधवांनी एकत्रित आले पाहिजे तसेच तसेच व्यसनाधीन न तसेच त्यापासून दूर राहिले पाहिजे. आपल्या सर्व प्रश्नाचे एकच औषध आहे ते म्हणजे शिक्षण.ते सर्वांनी घेतले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे यांनी ऐक्याचा समतेच्या बंधुत्वाच्या विचार समाजाने जोपासला पाहिजे. बुद्धापासून ते कर्मवीर भाऊराव पाटलांनी पर्यंत सर्वांनी शिक्षणाचे महत्त्व सांगितले आहे,त्यामुळे शिक्षण किती गरजेचे आहे याची उदाहरणे त्यांनी दिली.फकिराच्या पूर्वजाला छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार दिली.आपले नाते आपण इतिहासात शोधले पाहिजे.इतिहासात हे नाते शौर्य आणि बलिदानाची आहे. इतिहासाच्या प्रत्येक चळवळीत मातंग समाज होता. जो समाज इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही असे त्यांनी सांगितले. मागासवर्गीयांसाठी १५० योजना आहेत.त्या त्यांना मिळत नाहीत.याची खंत त्यांनी मांडली. पुरुषांप्रमाणे महिलांनी सहभागी व्हावे तसेच बोला,व्यक्त व्हा,प्रश्न मांडा अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा – कव्हे येथील चोपडे यांची महाराष्ट्र मराठी चित्रपट अर्थसहाय्य व परीक्षण समितीवर केली

आता गावागावांत होणार ‘संविधान सभागृह’ सोबतच ग्रंथालय व अभ्यासिका; सामाजिक न्याय विभागाचा निर्णय; वाचा किती मिळणार निधी

यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार संघटनेच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रमाच्या वेळी उपळाई चे सरपंच संदीप भैय्या पाटील,संभाजी ब्रिगेड माढा तालुका अध्यक्ष दिनेश जगदाळे,संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील अवघडे,उपाध्यक्ष राजाभाऊ वाघमोडे,माढा तालुका अध्यक्ष तानाजी ढोरे,ग्रामपंचायत सदस्य प्रदीप भैय्या चौगुले तसेच शाखेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक चौगुले यांनी केले.

litsbros

Comment here