अंजनगाव खेलोबा ग्रामपंचायतीच्या वतीने 1000 वृक्ष लागवडीचा शुभारंभ

अंजनगाव खेलोबा ग्रामपंचायतीच्या वतीने 1000 वृक्ष लागवडीचा शुभारंभ

माढा प्रतिनिधी
माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे ग्रामपंचायतीच्या वतीने 1000 रोपे लावण्यात येणार आहेत.
या 1000 वृक्ष लागवडीचा शुभारंभ अंजनगावच्या महिला सरपंच अरुणाताई प्रदिप चौगुले यांच्या हस्ते औषधी गुणधर्म असलेल्या कडुनिंबाचे रोप लावून करण्यात आली.

एखादे वृक्ष लावण्यासाठी व त्यांचे पालनपोषण करून ते मोठे होण्यासाठी भरपूर वर्षांचा कालावधी लागतो परंतू ते वृक्ष तोडण्यासाठी काही क्षण पुरेसे असतात. वाढत्या लोकसंख्येमुळे व शहरीकरणामुळे वृक्षांची संख्या कमी होत आहे. परिणामी निसर्गाचा समतोल बिघडत चाललेला आहे. निसर्गचक्र व्यवस्थित चालण्यासाठी वृक्षांची संख्या वाढणे गरजेचे आहे.


आपल्याला पर्यावरण संतुलन व्यवस्थित ठेवायचे असेल तर वृक्षारोपण करणे खूप गरजेचे असून काळाचीही गरज आहे. वृक्षांची संख्या वाढवणे खूप महत्वाचे आहे. वृक्षांची संख्या कमी झाल्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. त्याच्यामुळे बरेच आजार आपल्याला होत आहेत. श्वास घेण्यास शुद्ध ऑक्सिजन मिळत नाही.गावागावामध्ये अनेक ठिकाणी आता ग्रामपंचायत वृक्ष लागवडीकडे लक्ष देत आहेत. काही ग्रामपंचायतीने जो झाडें लावेल व जगवेल त्यांचा ग्रामपंचायत कर माफ केला जात आहे.

हेही वाचा – सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य द्या; एक महिन्यानंतर सर्व विभागांचा आढावा मला द्या; आ. संजयमामा शिंदे यांच्या प्रशासनाला सूचना

‘जग बदलणारा बापमाणूस’ हे नव्या पिढीला प्रेरणादायी भाषेत बाबासाहेब सांगणारे पुस्तक; खा. वर्षा गायकवाड मुंबईत खा.वर्षा गायकवाड यांच्या हस्ते 13 व्या आवृत्तीचे प्रकाशन

माढा तालुक्यातील अंजनगांव खेलोबा ग्रामपंचायतीने देखील 1000 रोपे लावून ती जतन करण्याची मोहीम हाती घेतली आहे.वृक्षारोपणामध्ये सिसम, कडुनिंब, करंजी याच बरोबर इतरही रोपे लावण्यात येणार आहेत.ही रोपे जिल्हा परिषद शाळा, आश्रम शाळा, स्मशानभूभी परिसर तसेच गावामध्ये लावण्यात येत आहेत.

ही झाडें लावण्यासाठी गावातील उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, कर्मचारी वर्ग, तरुण वर्ग, ग्रामस्थ तसेच गावातील महिला वर्ग देखील अग्रही होता.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line