आधी कोरोना टेस्ट मग देवाचे दर्शन;अंजनगाव ग्रामस्थांचा अनोखा उपक्रम
माढा प्रतिनिधि: माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथील श्री खेलोबा देवाच्या यात्रेस आज पासून प्रारंभ होत आहे.परंतू कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने ही यात्रा होणार नाही.असे असताना देखील नागरीक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे.यामुळे गावातील नागरिक,अंजनगाव केंद्र शाळेत शिक्षक व आरोग्य विभाग यांच्या वतीने कोरोना रॅलीचे आयोजन करण्यात आले.
कोरोना रॅलीनंतर श्री खेलोबा देवाच्या सभामंडपात एक बैठक भरवण्यात आली.कोरोना महामारीने जगाला कसे ग्रासले आहे.इतर गावांपेक्षा आपल्या गावाची रूग्णसंख्या कमी आहे.व ती वाढू नये यासाठी काय काय उपाय योजना कराव्यात, व कोरोनाला आळा घालावा
हे सांगण्यात आले.
सध्या विचार केला तर असे दिसते की,नागरिकांना कोरोना टेस्ट करण्याची भीती वाटते.आरोग्य विभागाचे कर्मचारी व गावातील आशा सेविका हे अतोनात कष्ट घेत आहेत.प्रत्येक नागरिकाने कोरोना टेस्ट करणे करजेचे आहे.परंतू भीतीपोटी नागरीक कोरोना टेस्ट करीत नाहीत अशी गावची अवस्था आहे.
या बैठकीत मंदीर प्रवेश व्दारात कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला.यामुळे जे दर्शनाला येतील त्यांना कोरोना टेस्ट द्यावी लागणार आहे.दर्शनाला जे भाविक येतील त्यांनी प्रथम कोविड टेस्ट करा मग दर्शन घ्या
यावेळी गावचे सरपंच आप्पाराव वाघमोडे,अंजनगाव केंद्र शाळेचे केंद्र प्रमुख बोबडे सर,मुख्याध्यापक थोरात सर,काळे सर, पाटेकर सर, वासुगडे सर,गावचे पोलिस पाटील,माढा पोलिस स्टेशननचे कोल्हापुरे, आरोग्य विभागाच्या बगाडे मॅडम,आशा सेविका भंडारे,सुतार,चौगुले व अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
Comment here