अंजनडोह व केडगाव येथील ऍट्रॉसिटीचे आरोपी मोकाट; करमाळा येथे निदर्शने, पिडीत विधवा महिलेचा आक्रोश

अंजनडोह व केडगाव येथील ऍट्रॉसिटीचे आरोपी मोकाट; करमाळा येथे निदर्शने, पिडीत विधवा महिलेचा आक्रोश

करमाळा(प्रतिनिधी); अंजनडोह व केडगाव येथील अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल असलेल्या आरोपींना तब्बल वीस दिवस लोटूनही अटक न झाल्याने ते मोकाट फिरत आहेत, कायद्याचा धाक न राहिल्याने आज गोरगरीबांवर अत्याचार होत असून यापुढील काळात अधिक तीव्र आंदोलन करणार आहे असे प्रतिपादन आरपीआय (आ) युवक जिल्हाध्यक्ष यशपाल कांबळे यांनी केले.

सदरील आरोपींना अटक करावी या मागणीसाठी गायकवाड चौक ते पोलीस चौकी पर्यंत जवाब दो व भव्य निदर्शने आंदोलन नागेशदादा कांबळे मित्र परिवार तसेच आरपीआय युवक आघाडी यांच्या वतीने करण्यात आले होते.

यावेळी अंजनडोह येथील पिडीत विधवा महिलेच्या मयत पतीचे आरोपी न अटक केल्याने मुलबाळांसह आंदोलनास आले असता त्यांचा हदय पिळवटून टाकणारा आक्रोश पाहून उपस्थितांचे मन हेलावले.
यावेळी प्रशासनावर ताशेरे ओढत सर्वच वक्त्यांनी प्रशासनाचा निष्क्रियतेचा समाचार घेतला.यावेळी आंदोलकांनी घोषणा देत पोलीस स्टेशन परिसर दणाणून सोडला.

हेही वाचा – ‘जग बदलणारा बापमाणूस’ हे नव्या पिढीला प्रेरणादायी भाषेत बाबासाहेब सांगणारे पुस्तक; खा. वर्षा गायकवाड मुंबईत खा.वर्षा गायकवाड यांच्या हस्ते 13 व्या आवृत्तीचे प्रकाशन

सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी शासनाच्या असलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी न करणाऱ्या बँकांना धडा कोण शिकवणार ? ज्येष्ठ पत्रकार येवले यांचा सवाल !

निवेदन नायब तहसीलदार काझी साहेब व पोलिस उप निरीक्षक माहूरकर साहेब यांना देण्यात आले होता.यावेळी अंजनडोह, केडगाव सह तालुक्यातील असंख्य बांधव उपस्थित होते.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line