अंजनडोह येथील अट्रोसिटी प्रकरणातील दोघांना अंतरिम जामीन
उमरड(प्रतिनिधी) ; दिनांक 19 /5 /2021 यात हकीगत अशी की दिनांक 14 /5/ 2021 रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मौजे अंजनडोह येथील समाज मंदिराजवळील कट्ट्यावर घटना घडलेली होती. यातील फिर्यादी याने राजेंद्र तुळशीराम जाधव, सचिन शब्बीर शेळके व गौरव उर्फ दादा सुरेश शेळके या तिघांनी मिळून त्यास जातिवाचक शिवीगाळ करून त्याचे मांडीवर सत्तूरणे वार करून त्यास जखमी केल्या बाबतची फिर्याद करमाळा पोलीस स्टेशनला दाखल झाली होती.
तदनंतर यातील आरोपी सचिन शेळके व गौरव शेळके यांना अटक करण्यात आली होती. तद्नंतर त्यांनी ॲडव्होकेट निखिल पाटील यांचे मार्फत बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात जामीन मिळणे कामी धाव घेतली होती.
सदर अर्जाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री ए बी भस्मे यांचे समोर झाली सदर सुनावणीवेळी फिर्यादी व फिर्यादीचे वकील सरकारी वकील तसेच आरोपीचे वकील ॲडवोकेट निखिल पाटील यांनी युक्तिवाद केला व आरोपीच्या वकिलांनी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार covid-19 संसर्गजन्य परिस्थिती मुळे व तपास कामी आरोपींची कुठलीही आवश्यकता नसल्यामुळे आरोपी नंबर दोन व तीन सचिन शब्बीर शेळके व गौरव सुरेश शेळके यांना अंतरिम जामीन मंजूर करावा असा युक्तिवाद केला.
हेही वाचा- ब्रेकिंग; लांडग्याच्या हल्ल्यात 4 शेळ्या मृत्युमुखी; करमाळा तालुक्यातील घटना
भावकीच्या वादात दोन सख्ख्या भावांची हत्या; आरोपी चुलत भाऊ पसार
सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपींची पंधरा हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर मुक्तता करण्यात आली सदर कामी आरोपीतर्फे एडवोकेट निखिल पाटील यांनी काम पाहिले.
Comment here