*अनिल झोळ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित*
केत्तूर (अभय माने) महाराष्ट्र राज्य कृती समिती च्या वतीने दिला जाणारा कृतिशील मुख्याध्यापक पुरस्कार श्री.राजेश्वर विद्यालय राजुरीचे मुख्याध्यापक अनिल झोळ यांना देऊन गौरविण्यात आले.शिक्षण क्षेत्रातील आदर्श कृतिशील पुरस्कार समारंभ बार्शी शनिवार (ता.14) येथे यशवंतराव चव्हाण सभागृह याठिकाणी आयोजित करण्यात आला होता.
हेही वाचा – दिपक ओहोळ यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान
जनसेवा हिच ईश्वरसेवा सोशल फाउंडेशनच्या सभासदांचा आदर्श गाव पाटोदा ला अभ्यास दौरा
सदर कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध व्याख्याते व इतिहासकार श्रीमंत कोकाटे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृती समितीचे सचिव शिक्षक माजी आमदार दत्तात्रय सावंत व आदि मान्यवर उपस्थित होते.अनिल झोळ यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल स्वामी मंडळाचे संस्थापक सचिव लालासाहेब जगताप,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व राजुरी ग्रामस्थ यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.