अमेरिकेतील संस्थेच्या वतीने वक्ते जगदीश ओहोळ यांच्या व्याख्यानाचे आयोजन

अमेरिकेतील संस्थेच्या वतीने वक्ते जगदीश ओहोळ यांच्या व्याख्यानाचे आयोजन

पुणे(प्रतिनिधी); करमाळयाचे सुपुत्र, सुप्रसिद्ध व्याख्याते व ‘जग बदलणारा बापमाणूस’ या प्रेरणादायी पुस्तकाचे लेखक जगदीश ओहोळ यांच्या ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन अमेरिकेतील ‘आंबेडकर असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका’ या संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
रविवार दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी भारतीय वेळेनुसार सायंकाळी साडे आठ वाजता हे व्याख्यान झूम मीटवरून जगदीश ओहोळ अमेरिकेतील बांधवांना देणार आहेत. यावेळी भन्ते सिरी सिवाली हे धार्मिक चर्चा करणार असून प्रिशा मांडवकर या प्रेरक धम्मकथा सांगणार आहेत.

‘जग बदलणारा बापमाणूस’ या पुस्तकाची जगभर चर्चा सुरू असून भारताबाहेरील अनेक देशातील आंबेडकरी अनुयायांना या पुस्तकांने भुरळ घातली आहे. त्यामुळे अनेक देशातील वैचारिक बांधव लेखक जगदीश ओहोळ यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहेत. त्याच माध्यमातून अमेरिकास्थित असणारे आंबेडकरी अनुयायी व संघटनांनी सध्या व्याख्याते व लेखक जगदीश ओहोळ यांच्या ऑनलाइन व्याख्यानाच्या आयोजन केलेले आहे. अमेरिकेतील बांधवांमध्ये जगदीश ओहोळ यांच्या व्याख्यानाबाबत प्रचंड उत्सुकता असून सर्वांनी या ऑनलाइन कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केलेले आहे.

हेही वाचा – हिसरे येथील शेतकऱ्याच्या लेकीचे यश; भारत सरकारच्या स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षेत निवड

32 वर्षानंतर उपस्थित राहून माजी विद्यार्थ्यांनी अनुभवली आपली शाळा

केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील लोकांकडून भारताचे सुपुत्र डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा, कार्याचा गौरव केला जात आहे. त्यातीलच एक भाग म्हणून आज
अमेरिकेतील संस्थेकडून मला ऑनलाईन व्याख्यानासाठी निमंत्रण आले आहे. लवकरच प्रत्यक्ष अमेरिकेत व्याख्यानाचे आयोजन करू असे आयोजकांनी सांगितले आहे. बाबासाहेबांच्या विचार प्रसाराचे हे कार्य असेच अविरतपणे करत राहू.

– जगदीश ओहोळ, वक्ते व लेखक

karmalamadhanews24: