विठ्ठलवाडीचे समस्त गुंड घराणे म्हणजे गुणवत्ता व संस्काराची खाण – अध्यक्ष रामचंद्र भांगे आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड व मेघश्री गुंड या बापलेकीचा सत्कार

विठ्ठलवाडीचे समस्त गुंड घराणे म्हणजे गुणवत्ता व संस्काराची खाण – अध्यक्ष रामचंद्र भांगे

आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड व मेघश्री गुंड या बापलेकीचा सत्कार

माढा/प्रतिनिधी – माढा तालुक्यातील विठ्ठलवाडीच्या शिक्षण क्षेत्राचे आधारस्तंभ व मार्गदर्शक सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या परिवारातील दुसऱ्या पिढीतील आठ मुले शिक्षक झाली असून तिसऱ्या पिढीतील एक इंजिनिअर,एक शिक्षक व एकजण वैद्यकीय क्षेत्रात एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे.यावरुन एक बाब लक्षात येते की,हे समस्त गुंड घराणे म्हणजे गुणवत्ता व संस्काराची खाण आहे.ही बाब निश्चितच कौतुकास्पद व प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन श्री विठ्ठल सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष रामचंद्र भांगे यांनी केले आहे.

ते विठ्ठलवाडी ता.माढा येथे महाराष्ट्र राज्य कृती समितीचा कृतीशील शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल राजेंद्र बाळू गुंड यांचा व बुद्धिबळ स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल मेघश्री राजेंद्र गुंड या गुणवंत बापलेकीचा सत्कार करताना बोलत होते.

यावेळी श्री स्वामी समर्थ पतसंस्थेचे सचिव सुशेन भांगे यांनी सांगितले की,जे लोक सत्कर्म करून ध्येयाच्या दिशेने प्रामाणिकपणे प्रयत्न करतात ते हमखास यशस्वी होतात.हाच प्रत्यय या बापलेकीच्या कर्तृत्वातून दिसून येतो.जे लोक नेहमी प्रयत्नशील राहून सकारात्मक विचार करुन चांगल्या विचारी लोकांच्या सानिध्यात राहतात ते समाजात स्वतःचा वेगळा आदर्श निर्माण करतात.समस्त गुंड परिवारातील कष्टाळू व होतकरू गुणवंतांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा – उपळाई बुद्रुक येथील श्री नंदिकेश्वर विद्यालयात क्रीडा सप्ताह संपन्न

विठ्ठलवाडीचे राजेंद्र गुंड जिल्हास्तरीय कृतीशील शिक्षक पुरस्काराने सन्मानित

यावेळी सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड, शांताबाई गुंड,मोहन भांगे, सुजाता भांगे,मेघना गुंड,सुवर्णा भांगे,शांता भांगे,सत्यवान शिंगाडे,दत्तात्रय काशीद,महेश भांगे,सार्थक भांगे,सक्षम भांगे यांच्यासह ग्रामस्थ व नातेवाईक उपस्थित होते.

फोटो ओळी- विठ्ठलवाडी ता.माढा येथे कृतीशील शिक्षक राजेंद्र गुंड व मेघश्री गुंड यांचा सत्कार करताना अध्यक्ष रामचंद्र भांगे,सचिव सुशेन भांगे व इतर मान्यवर.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line