महाराष्ट्रशैक्षणिक

अकरावी प्रवेश:शिक्षण विभागाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

अकरावी प्रवेश:शिक्षण विभागाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

 दहावीची परीक्षा रद्द झाल्याने अकरावीचे प्रवेश गुणवत्ता यादीनुसार व्हावेत यासाठी राज्य सरकारने सीईटी परीक्षेचा पर्याय दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दिला आहे.ही सीईटी परीक्षा जुलै अखेर किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होईल अशी माहिती आता शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

 याबाबत वर्षा गायकवाड म्हणाल्या की, ही प्रवेश परीक्षा पुर्णतः ऐच्छिक असून परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना आगाऊ माहिती मिळावी तसेच परीक्षेची तयारी करण्यासाठी पुरेसा अवधी मिळावा यासाठी परीक्षा माहिती जाहीर करण्यात आली आहे.

सीईटी म्हणजेच अकरावीची प्रवेश परीक्षा विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना जुनिअर कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्यासाठी ही परीक्षा असणार आहे.

ही परीक्षा पूर्णपणे दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असून एकूण 100 मार्कांची ही परीक्षा असणार आहे. यात इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांवर प्रत्येकी 25 मार्कांचे प्रश्न असणार आहेत.तर, CET प्रवेश परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेतली जाणार असून त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर जाऊन ही परीक्षा द्यावी लागणार आहे.

हेही वाचा-करमाळा तालुक्यातील पाथुर्डी येथे किरकोळ कारणावरून दोघांना काठीने व लथाबुक्क्यांनी मारहाण; पोलिसांत गुन्हा दाखल

पुरंदर तालुक्यात खळबळ; माजी मंत्री विजयबापू शिवतारेंच्या पत्नी म्हणतात ‘यांच्या दोन बायका’ तर मुलीचे भावांवर गंभीर आरोप

असे हि ते म्हणाले. दरम्यान, जे विद्यार्थी ही प्रवेश परीक्षा देऊ इच्छित नाही त्यांना परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनंतर अकरावीत प्रवेश मिळणार आहे. त्यांचं मूल्यमापन हे दहावीच्या गुणांच्या आधारे होणार आहे. असेही स्पष्ट केले आहे.

litsbros

Comment here