अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी अभिनव महाविद्यालय वाशिंबे मध्ये मोफत नाव नोंदणी केंद्र सुरू
करमाळा प्रतिनिधी – नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ वाशिंबेचे, अभिनव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाशिंबे येथे इयत्ता अकरावी ऑनलाइन केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी निशुल्क ऑनलाईन नाव नोंदणी सुविधा केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे. यावर्षी प्रथमच शासन निर्णयानुसार ऑनलाइन केंद्रीय पद्धतीने अकरावीचे गुणवत्तेनुसार प्रवेश होणार असल्याची माहिती विद्यालयाचे सचिव श्री महादेव झोळ सर यांनी दिली.
यावर्षी अकरावी कला व विज्ञान शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिनांक 19 ते 28 मे 2025 या कालावधीत प्रवेशासाठी ऑनलाइन केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. तसेच यावर्षी इयत्ता अकरावी साठी मर्यादित जागा आहेत. करमाळा तालुक्यासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अभिनव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हे नेहमीच कटिबद्ध असते. महाविद्यालयाने गुणात्मक आणि संख्यात्मक दर्जा राखत उज्वल यशाची दीर्घ परंपरा टिकून ठेवली आहे. या महाविद्यालयांमध्ये कला व विज्ञान या शाखेत विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. तसेच अकरावी, बारावी आयटी व क्रॉप प्रोडक्शन या विषयांची निवड करण्याची विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे.
महाविद्यालयात सुसज्ज संगणक प्रयोगशाळा, प्रशस्त ग्रंथालय, भव्य क्रीडांगण, विविध खेळाचे स्वतंत्र मार्गदर्शन, विविध प्रकारच्या सरकारी आर्थिक सवलती, व शिष्यवृत्ती, अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, तज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग, स्पर्धा परीक्षांचे केंद्र, डिजिटल क्लासरूम, विविध विषयांवरील चर्चासत्रे व परिसंवादाचे आयोजन, सुसज्ज व्यायामशाळा अशा अत्याधुनिक सुविधा महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या सुविधांचा विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊन लाभ घ्यावा असे आवाहन प्राध्यापक श्री. निलेश जाधव सर यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी कला विभाग प्रा. श्री. मंगेश साखरे सर, मोबाईल:- 7447503110 व विज्ञान विभाग प्रा. श्री. निलेश जाधव सर मोबाईल:- 9421783893 यांच्याशी संपर्क करण्यात यावे असे आवाहन प्रवेश प्रक्रिया समितीने केली आहे.