महाराष्ट्रसोलापूर जिल्हा

अकलूज येथील साखळी पद्धतीच्या बेमुदत उपोषणास जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने पाठिंबा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

अकलूज येथील साखळी पद्धतीच्या बेमुदत उपोषणास जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने पाठिंबा

अकलूजमधील प्रांत कार्यालयासमोर येथे दि.२२ जून २०१९ पासून नागरिकांनी साखळी पद्धतीने उपोषण सुरू केले आहे.अकलूज,माळेवाडी या ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर परिषदेमध्ये व्हावे व नातेपुते ग्रामपंचायतीचे रुपांतर नगर पंचायतीमध्ये व्हावे अशी नागरिकांची मागणी आहे. नागरिकांच्या हक्काच्या या मागणीस जिजाऊ ब्रिगेड (सोलापूर- पंढरपूर विभाग ) माळशिरस तालुका यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.

अकलूज प्रांत कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या नागरीकांना पाठिंबा देण्यात आल्याचे पत्र जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने काढण्यात आले.हे पत्र अकलूज ग्रामपंचायतीचे उपसरपंच शिवतेजसिंह उदयसिंह मोहिते पाटील यांना जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकार्‍यांच्या हस्ते देण्यात आले.


यावेळी सौ. मीनाक्षी अमोल जगदाळे जिजाऊ ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष, सौ मनोरमा दत्तात्रय लावंड माळशिरस तालुका अध्यक्ष ,सौ मनीषा संजय गायकवाड माळशिरस तालुका उपाध्यक्ष, पुनम सुसलादे सचिव, सौ शुभांगी शिरसागर अकलूज शहर अध्यक्ष ,सौ शारदा चव्हाण

हेही वाचा-अंजनडोह येथील हातभट्टी दारू निर्मिती व विक्री करणार्‍याविरुद्ध करमाळा पोलिसांची धडाकेबाज कारवाई

करमाळयाच्या ‘या’ तरुणामुळे चिपळूण येथील पंधरा जणांचा वाचला जीव : मुख्यमंत्र्यांकडून तात्काळ दखल आणि मदत

अकलूज शहर कार्याध्यक्ष, सौ कल्पना बापूराव चव्हाण संघटक ,सौ सुवर्णा संतोष क्षीरसागर संघटक, सौ आशा सावंत संघटक, सौ सुवर्णा भारत गोरवे ,सौ मनीषा जाधव ,सौ संगीता जगदाळे तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या सदस्या उपस्थित होत्या. तसेच वेगवेगळ्या पक्षांचे व संघटनांचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.

litsbros

Comment here