अक्कलकोट येथे दिव्यांग मुलांसाठी मोफत होमिओपॅथिक शिबिर
केत्तूर (अभय माने) श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट व डॉ.प्रफुल्ल विजयकर होमिओपॅथिक रिसर्च फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार मार्च रोजी 20 वर्षांखालील दिव्यांग रुग्ण मुलांसाठी होप फॉर होपलेस या मोफत वैद्यकीय शिबीराचे आयोजिन करण्यात आले असून हे विशेष शिबिर श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलीत मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील श्री.स्वामी समर्थ रुग्णालयात या मोफत होमिओपॅथिक शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली.
रविवार 2 मार्च रोजी सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत हा शिबीर संपन्न होईल. या शिबीरात डॉ.प्रफुल्ल विजयकर यांच्या प्रेडीक्टिव्ह होमिओपॅथिक वैद्यकीय पथकाच्या वतीने २० वर्षांखालील दिव्यांग मुलांची शारिरीक, मानसिक, बौद्धीक तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात येतील, तरी जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. विजयकर व
श्री.स्वामी महाराज मंदिर समिती व श्री स्वामी समर्थ रूग्णालयाचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे.
” अक्कलकोट देवस्थानच्या वतीने चेअरमन महेश इंगळे हे सामाजिक बांधिलकी जोपासत सातत्याने विविध उपक्रम राबवत आहेत यातूनच स्वामी सेवेचा विस्तार होत आहे . याचाच एक भाग म्हणून हे आरोग्य शिबिर आयोजित केले असून 20 वर्षांखालील दिव्यांग मुलांच्या मोफत उपचारासाठी करमाळा तालुक्यातील पालकांनी दिलेल्या वेळेत अक्कलकोट येथे प्रत्यक्ष उपचार व मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा *
– भारतराव शिंदे पाटील, मा.सभापती पं.स. करमाळा व
– विश्वस्त, स्वामी समर्थ देवस्थान , अक्कलकोट .
हेही वाचा – शहीद जवान नवनाथ गात यांचा वरकुटे येथे 2 मार्च रोजी स्मृतीदिन विविध कार्यक्रमाचे आयोजन
” प्रेडीक्टिव्ह होमिओपॅथी ही विश्वसनीय उपचार पद्धती असून आम्ही तिचा प्रचार,प्रसार करत आहोत. ही उपचार पद्धती दिव्यांग रुग्णांच्या मनोकायिक, अनुवांशिक तसेच जनुकीय दोषामुळे निर्माण झालेल्या आव्हानात्मक परिस्थितीला योग्य प्रकारे उपचार देऊन रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करत आहे
— डॉ. बिपीन परदेशी ,करमाळा .
( होमिओपॅथी प्रॅक्टिशनर डॉक्टर )