बुद्धिबळ स्पर्धेत आकांक्षा क्षिरसागर हिची जिल्हा पातळीसाठी निवड
केत्तूर (अभय माने) सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत नुकत्याच केम येथे पार पडलेल्या करमाळा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत मुली मोठा गट बुद्धिबळ या क्रीडा प्रकारात जि.प.शाळा पोफळज (ता.करमाळा) ची विद्यार्थिनी कु.आकांक्षा तानाजी क्षीरसागर हिने प्रथम क्रमांक पटकावला.तिची जिल्हा स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
आकांक्षाला पोफळजच्या आदर्श शिक्षिका रेखा शिंदे-साळुंके मॅडम यांचे मार्गदर्शन मिळाले.चिखलठाण केंद्रप्रमुख वंदना पांडव यांनी आकांक्षाला रोख रकमेचे बक्षीस देऊन तिचा गौरव केला.या यशाबद्दल विजेती बुद्धिबळपटू आकांक्षा क्षीरसागर व मार्गदर्शक शिक्षिका रेखा शिंदे-साळुंके,मुख्याध्यापिका मुमताज फकीर,शिक्षिका शुभांगी बोराटे,सहशिक्षक जहांगीर सय्यद, निलेश जाधवर,विवेक पथरुडकर यांचेसह गटशिक्षणाधिकारी जयवंत नलवडे,
अनिल झोळ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
यश कल्याणीचे अध्यक्ष प्रा.गणेश करे-पाटील सर,नितीन कदम,पोफळजचे सरपंच कल्याण बापू पवार, माजी सरपंच दत्तात्रय गव्हाणे,उपसरपंच राणी बिभिषण गव्हाणे,चिखलठाण केंद्रप्रमुख वंदना पांडव,शाळा व्य.समिती अध्यक्ष राहूल धुमाळ,दत्तात्रय पवार सर,मारुती पवार,मेजर सचिन पवार,अरुण पवार,अक्षय कुलकर्णी, उत्तरेश्वर कांबळे,विस्ताराधिकारी मिनीनाथ टकले, मा.केंद्रप्रमुख भारत पांडव,केंद्र प्रमुख वैशाली महाजन,केंद्र प्रमुख रमाकांत गटकळ,केंद्र प्रमुख संजय मुंडे यांनी अभिनंदन केले.
छायाचित्र :केम -आकांक्षाचे अभिनंदन करताना विस्ताराधिकारी नितीन कदम रेखा शिंदे साळुंके केंद्रप्रमुख वंदना पांडव,केंद्रप्रमुख वैशाली महाजन,केंद्रप्रमुख रमाकांत गटकळ केंद्रप्रमुख संजय मुंडे विवेक पाथरूडकर