करमाळाशेती - व्यापार

सावडी येथे कृषी दिन व कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन: आधुनिक शेतीविषयक केले मार्गदर्शन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सावडी येथे कृषी दिन व कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन: आधुनिक शेतीविषयक केले मार्गदर्शन

करमाळा (प्रतिनिधी) : आज दिनांक 01 जुलै 2021 रोजी मौजे सावडी ता. करमाळा येथे कृषी दिन व कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रमाचे समारोप समारंभ आयोजित करण्यात आला. या सप्ताहामध्ये BBF लागवड तंत्रज्ञान, जमीन आरोग्य पत्रिकेनुसर खताचा वापर, कडधान्य आंतर पिक तंत्रज्ञान, विकेल ते पिकेल, मंडळ अंतर्गत येणाऱ्या गावातील महत्वाच्या किड व रोग नियत्रंण उपाय योजना इ. बाबत मार्गदर्शन करण्यात येते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषि सहायक श्री.असिफ तांबोळी यांनी केले .कृषि सहायक श्री.हरिभाऊ दळवी यांनी BBF लागवड तंत्रज्ञान, जमीन आरोग्य पत्रिकेनुसर खताचा वापर, कडधान्य आंतर पिक तंत्रज्ञान, विकेल ते पिकेल, गावातील महत्वाच्या किड व रोग नियत्रंण उपाय योजना ,MREGS फळबाग लागवड या बाबत मार्गदर्शन केले . तसेच दरम्यान उपस्थित शेतकरी यांना मंडळ कृषि अधिकारी,

केतूर श्री. डी. एस. चौधरी यांनी कृषी विभागातील विविध योजना व औषधी वनस्पती लागवड करण्यास प्रोसाहन व त्याची पूर्ण माहिती दिली. कार्यक्रमाचे आभार कृषी सहाय्यक गायकवाड साहेब यांनी मानले. या कार्यक्रमासाठी उपस्थित कृषी सहाय्यक श्री. बागवान एफ. के., शिंदे साहेब, , कर्पे मॅडम,.तसेच सावडी गावाचे सरपंच व उपसरपंच प्रतिनिधी प्रगतशील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

आजपासून सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री; गॅस सिलेंडरच्या किंमतीत होणार ‘इतकी’ वाढ

सोन्याच्या किंमतीत झाली दोन महिन्यातील सर्वाधिक घट

पावसाचा मोठा ब्रेक : करमाळा तालुक्यातील शेतकरी अडचणीत

litsbros

Comment here