पुणेसोलापूर

पुणे- सोलापूर महामार्गावर अपघात; एका प्रवाशाचा मृत्यू तर १५ प्रवासी जखमी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

पुणे- सोलापूर महामार्गावर अपघात; एका प्रवाशाचा मृत्यू तर १५ प्रवासी जखमी

पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर लक्झरी बसने टॅंकरला जोरदार धडक दिली. या अपघात एक प्रवाशाचा मृत्यू झाला तर सुमारे पंधरा प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये काही प्रवासांना गंभीर मार लागला असुन दुखापत झाली आहे.

पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर पाटस टोल नाक्यापासुन काही अंतरावर असलेल्या बारामती फाटा येथे मंगळवारी ( दि २१) रात्री साडे अकरा वाजण्याच्या आसपास हा अपघात झाला. मारुती ग्यानबा वडेर (वय ५५,रा.मुखेड जि.नांदेड ) या प्रवासाची हा अपघात मृत्यू झाला असून या अपघातात ट्रक चालक हवासिंग छित्तरसिंग, व प्रवासी अर्चना गणेश देशमुख, श्रेया भगवान श्रीकंठवार, बालाजी पाटील, यश बालाजी पाटील, दिगंबर हनुमंत जाधव, फिरोज काझी, लक्ष्मीबाई गुणवंत सुद्रे, उषाबाई खांडेकर, विठ्ठल गोरबा कोरंबे,माधव इंगले, माधव सुधाकर पांचाळ,कु. विजय व्यंकट वडेर आदी या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची नावे आहेत.

या अपघातात सोळा प्रवासी जखमी झाल्याने त्यांना पाटस येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मारुती वडेर या प्रवासाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर जखमी प्रवाशांवर उपचार सुरू असुन यातील काही प्रवासांना गंभीर दुखापत झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार सुनील बगाडे, पोलिस हवालदार भानुदास भंडगर, पोलीस नाईक अजित इंगोले, पोलिस मित्र रमेश चव्हाण आदींनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना वाहनामधुन ग्रामस्थ व इतर प्रवाशांच्या मदतीने बाहेर काढून पाटस येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. प्रवासी पांडुरंग ग्यानबा वडेर यांनी यवत पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने लक्झरी बस चालक गजानन वैजनाथ जाधव यांनी वाहतूकीचे नियमांचे आणि रहदारी चे उल्लंघन करून अपघात कारणीभूत ठरल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या अपघातात दोन्ही वाहनांचे मोडतोड झाल्याने मोठं नुकसान झाले आहे. तर या अपघाताच्या घटनेमुळे पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजुने वाहतुकीची कोंडी झाली होती.

litsbros

Comment here