ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दुर्दैवी घटना: भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

दुर्दैवी घटना: भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गवर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सर्व मृत हे जयसिंगपूर येथील आहेत. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामधील कासेगावजवळ कारने कंटनेरला मागून जोराची धडक दिली. यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तीघांचा रूग्णालयात दाखल केल्यानंतर मृत्यू झाला. शनिवारी दुपारी हा अपघात झाला आहे. 


या भीषण अपघातात अजिंक्य आण्णासो शिरोटे, स्मिता अभिनंदन शिरोटे, सुनेशा अभिनंदन शिरोटे,  विरु अभिनंदन शिरोटे यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत कासेगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. या अपघातात कारचा अक्षरक्ष: चक्काचूर झाला आहे. 
याबाबत कासेगाव पोलीस आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,  कोल्हापूर दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला कंटेनर (एमएच 05 ए एम 3644) थांबलेला होता. यावेळी कोल्हापूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारी कार (एमएच 14 डी. एन 6339) ने उभ्या असलेल्या कंटेनरच्या डाव्या बाजूस जोराची धडक दिली.

या अपघातात कारमधील पाच जणांचा  मृत्यू झाला. यामध्ये दोघांचा जागीच तर तिघांचा उपचारासाठी रूग्णालयात दाखल केल्यानंतर मृत्यू झाला. अपघातातील कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला  असून गाडीचा वरील टप आणि दरवाजे पूर्णपणे तुटलेले होते. वरचा भाग पूर्णपणे उडाला होता. तर आतील सिटचा भाग देखील पूर्णपणे तुटलेला होता. 


शिरोटे कुटुंबीय पिंपरी – चिंचवडहून जयसिंगपूरकडे निघाले असताना वाळवा तालुक्यातील कासेगावजवळील येवलेवाडी फाटा येथे हा अपघात झाला.  अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गाडीतील सर्वांना बाहेर काढले. यावेळी दोन जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर तीन जण गंभीर जखमी झाले होते. स्थानिकांनी जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल केले. परंतु, रूग्णालयात तिघांचा मृत्यू झाला.  

litsbros

Comment here