कुर्डुवाडीबार्शीसोलापूर जिल्हा

खासगी बस आणि ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात; दोन ठार तर सहाजण जखमी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

खासगी बस आणि ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात; दोन ठार तर सहाजण जखमी

सोलापूर : बार्शी-कुर्डुवाडी रस्त्यावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सहा  जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि लक्झरी बसची समोरासमोर धडक होऊन हा अपघात घडला. बार्शी शहर परिसरात तिरकस पुलाजवळ ही घटना घडली.


घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बार्शी-कुर्डुवाडी रोडवर असलोल्या तिरकस पुलानजीक समोरून येणाऱ्या भरधाव बसने उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला धडक दिली. हा अपघात पहाटे पाचच्या सुमारास घडला. या अपघातामध्ये  दोन जण जागीच ठार झाले, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. मृतांची नावे अद्याप समोर येऊ शकलेली नाहीत.


दरम्यान या अपघातामध्ये वाहनांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. समोरासमोर धडक झाल्याने दोनही वाहनांचा समोरचा भाग डॅमेज झाला आहे. अपघातामुळे काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती. जखमींना रुग्णालयात हलवण्यानंतर पुन्हा वाहतूक सुरळीत सुरू झाली.

litsbros

Comment here