पुणेसोलापूर

पुणे- सोलापूर महामार्गावर लक्झरी बसचा भीषण अपघात, 4 ठार तर 20 पेक्षा जास्त प्रवासी गंभीर जखमी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

 पुणे- सोलापूर महामार्गावर लक्झरी बसचा भीषण अपघात, 4 ठार तर 

20 पेक्षा जास्त प्रवासी गंभीर जखमी

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चौफुला नजीक वाखारी हद्दीत बस आणि ट्रक यांचा अपघात झाला. या अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू झाला आणि 20 पेक्षा जास्त प्रवासी गंभीर जखमी झाले. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

लक्झरी बस सोलापूरहून पुण्याच्या दिशेने जात होती. चौफुला ओलांडल्यानंतर वाखारी हद्दीत एका ट्रकचा टायर फुटल्याने तो ट्रक महामार्गावर थांबला होता. सोलापूरहून पुण्याला जात असलेल्या लक्झरी बसच्या ड्रायव्हरला ट्रकचा अंदाज आला नाही. यामुळे लक्झरी बस थांबलेल्या ट्रकला धडकली. महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला बसची जोरदार धडक बसली. या अपघातात बसच्या एका बाजूचा चुराडा झाला. 

बसने ट्रकला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू झाला आणि 20 पेक्षा जास्त प्रवासी गंभीर जखमी झाले. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. जखमींना यवत आणि केडगावमधील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. काही गंभीर जखमींना पुण्यातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघात प्रकरणी यवत पोलीस पुढील तपास करत आहेत.

litsbros

Comment here