मंगळवेढासोलापूर जिल्हा

भाविकांच्या ट्रॅव्हल्सला अपघात; एकाचा मृत्यू तरआठ जण गंभीर जखमी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

भाविकांच्या ट्रॅव्हल्सला अपघात; एकाचा मृत्यू तरआठ जण गंभीर जखमी

सोलापूरातील मंगळवेढा तालुक्यातील मंगळवेढा फाटा या ठिकाणी देवदर्शनासाठी निघालेल्या 38 भाविकांच्या ट्रॅव्हल्सला मोठा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 38 भाविकांना घेऊन जाणारी ही ट्रॅव्हल्स बस अपघातानंतर पलटी झाली. या अपघातामध्ये एका भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर 29 जण  बचावले आहेत.

बुधवारी सकाळी साडेपाच ते साडेसहाच्या दरम्यान हा अपघात झाला आहे. कर्नाटकातील देवदर्शनासाठी ही ट्रॅव्हल्स निघाली होती. ट्रॅव्हल्सचा वेग जास्त होता. ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळेच ही बस पलटी झाली असल्याच अपघातग्रस्त भाविकांनी म्हटलं आहे. सध्या जखमींवर सोलापूर शहरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

litsbros

Comment here