क्राइममहाराष्ट्र

दुर्दैवी: टायर फुटले अन् विशीतील पाच मित्रांनी गमावला जीव

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

 दुर्दैवी: टायर फुटले अन् विशीतील पाच मित्रांनी गमावला जीव

सिन्नरच्या मोहदरी घाटात  झालेल्या अपघातात 5 प्रवाशांची क्षमता असलेल्या स्विफ्ट कारमध्ये तब्बल 8 मित्र मैत्रिणी बसले होते. मोहदरी घाटातील टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात तब्बल पाच जणांना प्राण गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली. नाशिक- सिन्नर मार्गावरील ब्लॅकस्पॉट म्हणून ओळख असलेल्या मोहदरी घाटात आज तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. सिन्नर जवळील मोहदरी घाटात स्विफ्ट का,रचे नियंत्रण सुटल्याने ही कार डिव्हायडर तोडून कार पलीकडच्या लेनवर जाऊन दोन वाहनांवर आदळली. यात पाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व राहणार नाशिकचे असून एका लग्न सोहळ्यानिमित्त संगमनेरला गेले होते. 


अपघाताची भीषणता इतकी होती की कारमधील 8 पैकी पाच जणांचा जागेवर मृत्यू झाला. मयतांमध्ये 3 मुली आणि 2 मुले समावेश आहे. सिन्नरच्या अपघातातील पाचही मृतांची ओळख पटली असून हे सर्व जण नाशिक शहरातीलच रहिवासी आहेत. यामध्ये हर्ष दीपक बोडके (वय 17 वर्षे), सायली अशोक पाटील (वय 17 वर्षे), मयुरी पाटील (वय 16 वर्षे), प्रतीक्षा घुले (वय 17 वर्षे), शुभम तायडे (वय 17 वर्षे) अशी मृत झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे सर्व विद्यार्थी अकरावी-बारावीमध्ये ते शिक्षण घेतात. 


नाशिक- सिन्नर महामार्गावर काल दुपारच्या सुमारास बस अपघातात दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच नाशिक सिन्नर रस्त्यावरील मोहदरी घाटात भयंकर अपघातात वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. नाशिकचे काही विद्यार्थी संगमनेर ला मित्राच्या लग्नसमारंभात गेले होते. तिकडून परतत असताना मोहदरी घाटात आल्यानंतर कारचे टायर फुटले. टायर फुटल्याने स्विफ्ट कार डिव्हायडर तोडून दुसऱ्या लेनमध्ये गेली. दुसऱ्या लेनमधून प्रवास करणाऱ्या इनोव्हा आणि एका दुसऱ्या स्विफ्टला धडक दिली. अपघातानंतर टायर फुटलेल्या कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. 
एकूणच पाच प्रवाशी क्षमता असलेल्या या कारमध्ये तब्बल आठ जण प्रवास करत होते. मोहदरी घाटात आल्यानंतर कार वेगात असल्याने टायर फुटले, अन भीषण अपघात झाला. विशेष म्हणजे हे सर्वजण 17 ते 19 वर्ष वयोगटातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातानंतर पुन्हा एकदा वाहनामधील प्रवाशी क्षमतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

litsbros

Comment here