आवाटी येथील शेतकऱ्याची कन्या ऐश्वर्या वाघमोडे ही विद्यार्थिनी 99.80% गुण मिळवून करमाळा तसेच परंडा तालुक्यात दहावी मध्ये प्रथम

आवाटी येथील शेतकऱ्याची कन्या ऐश्वर्या वाघमोडे ही विद्यार्थिनी 99.80% गुण मिळवून करमाळा तसेच परंडा तालुक्यात दहावी मध्ये प्रथम

करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील आवाटी येथील शेतकरी कुटुंबातील मुलगी ऐश्वर्या रमेश वाघमोडे यांनी नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत करमाळा तसेच परंडा तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला ऐश्वर्या रमेश वाघमोडे हिला 99.80% गुण मिळाले. 


ऐश्वर्या रमेश वाघमोडे यांनी अथक परिश्रमातून सदरचे यश मिळवले असून ती तिच्या वस्तीवरून आवाटी तर आवाटी वरून परंडा येथे शिक्षणासाठी जात असे बावची विद्यालय परंडा येथे ती शिक्षण घेत होती कुमारी ऐश्वर्या वाघमोडे ही आवाटी येथील शेतकरी रमेश वाघमोडे यांची कन्या आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत तसेच कोणतीही ट्युशन न लावता तिने घवघवीत यश मिळवले आहे.

हेही वाचा – सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर; करमाळ्यातील लीड स्कुलमध्ये शौर्या किशोर शिंदे प्रथम

तरुणांनो तुमच्या धडावर तुमचाच मेंदू असुद्या, जग जिंकता येते; शारदा व्याख्यानमालेत जगदीश ओहोळ यांचे प्रतिपादन

तिच्या या यशाबद्दल माजी आमदार नारायण आबा पाटील, सरपंच साबीर खान पठाण, उपसरपंच गोपीनाथ सोनवर माजी सरपंच संजय नलावडे एडवोकेट आलिम पठाण दादा बंडगर तसेच मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक गोकुळ नलावडे तसेच आवाटी विका सोसायटीचे चेअरमन राजू खान व आवाटी येथील ग्रामस्थांनी तिचे विशेष तोंड भरून कौतुक केले आहे करमाळा तसेच परंडा तालुक्यामध्ये दहावीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या ऐश्वर्या रमेश वाघमोडे हिचा आवाटी ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line