करमाळाक्राइमसोलापूर जिल्हा

आवाटी येथे अवैध वाळू उपसा सुरूच; नदीकाठची शेती धोक्यात; प्रशासनाच्या नाकावर टिच्चून अवैध धंदे जोमात

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

आवाटी येथे अवैध वाळू उपसा सुरूच; नदीकाठची शेती धोक्यात; प्रशासनाच्या नाकावर टिच्चून अवैध धंदे जोमात

करमाळा(प्रतिनिधी) ; करमाळा तालुक्यातील आवाटी या गावात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून अवैध हातभट्टी विक्री आणि गावालगत असलेल्या सीना नदीपात्रातून अवैध वाळूउपसा सुरू आहे. गावचे प्रशासनच वाळू तस्कर आणि दारू गाळणाऱ्या लोकांच्या दबावाखाली असल्यामुळे काहीही कारवाई करत नाहीत, असा आरोप गावकरी करत आहेत.

काल दि: 18 सप्टेंबर रोजी अजिनाथ दत्तू बंडगर हे वाळू तस्करांना ‘वाळू काढू नका’ असे सांगण्यासाठी गेले असता वाळू तस्कर जालिंदर सिद्धेश्वर बंडगर याने त्यांना दमदाटी केली. आम्ही खालपासून वरपर्यंत हप्ते भरतोय तुम्ही काय करायचं ते करा.. असा दम देखील जालिंदर बंडगर याने दिला.

सततच्या वाळू उपशामुळे गावातील नदीकाठची शेती धोक्यात आली आहे. नदीला मोठं पाणी आल्यानंतर शेकडो एकर शेती वाहून जाऊ शकते. तरी आम्ही आपणास विनंती करतो की संबंधित लोकांवर कायदेशीर कारवाई लवकरात लवकर करणे अपेक्षित आहे.

हेही वाचा-बीए, बीकॉमच्या विद्यार्थ्यांना ‘एमएस्सी’साठी प्रवेश प्रक्रिया सुरू; सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी

माणुसकीच्या हातांचा करमाळयात कृतज्ञतापूर्वक गौरव सोहळा संपन्न; ‘यांचा’ झाला सन्मान

तसे न झाल्यास तहसील कार्यालय करमाळा या ठिकाणी आम्ही आंदोलन करू अशा आशयाचे निवेदन दयानंद सेवक बंडगर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इमेल द्वारे पाठवले आहे.

litsbros

Comment here