करमाळाधार्मिकसोलापूर जिल्हा

आवाटी येथील ‘या’ आठ वर्षाच्या बालकाचा रमजान महिन्यातील एक दिवसाचा कडक रोजा पूर्ण

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

आवाटी येथील ‘या’ आठ वर्षाच्या बालकाचा रमजान महिन्यातील एक दिवसाचा कडक रोजा पूर्ण

करमाळा(प्रतिनिधी) ;
आवाटी तालुका करमाळा येथील हजरत वली चांद पाशा कादरी यांचे खादिम गुलाम नबी कादरी यांचे चिरंजीव सुफी हसनैन कादरी या आठ वर्षाच्या बालकाने रमजान महिन्यातील पवित्र असा एक दिवसाचा कडक रोजा पूर्ण केला आहे.

सुफी हसनैन हा इयत्ता दुसरीच्या वर्गात शिक्षण घेत असून तो लहानपणापासूनच धार्मिक प्रवृत्तीचा आहे कुराणातील अध्याय त्याचे तोंडपाठ आहे त्याने अगदी लहान वयात एक दिवसाचा रोजा पूर्ण केला.

मुस्लिम धर्मियात रोजा याला विशेष महत्त्व आहे इस्लामच्या पाच तत्वा पैकी रोजा महत्त्वाचा मानला जातो रमजानच्या पवित्र अशा या महिन्यात मुस्लिम बांधव दिवसभर थुंकी न मिळता रमजानचे कडक असे रोजे पूर्ण करतात अशाच पद्धतीचा एक दिवसाचा कडक रोजा सुफी हसनैन याने पूर्ण केला.अगदी लहान वयात त्याने रोजा पूर्ण केल्याबद्दल त्याचे हजरत सुफी वली चांद पाशा कादरी वली बाबा यांनी मानाचा हार घालून विशेष सत्कार केला.

हेही वाचा – ‘होंडा गाडी आण’ म्हणत विवाहितेचा छळ; करमाळा येथील पती व सासरच्या मंडळी विरोधात श्रीरामपूर येथे गुन्हा दाखल

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सैन्य दलात सेवा, आता मुंबई पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या बजरंग चौगुले यांचा करमाळयात सन्मान

लहान वयात पवित्र असा रोजा पूर्ण केल्या बद्दल त्याचे दर्गाह कमिटीचे अध्यक्ष कादर भाई तांबोळी तसेच दर्गाहचे खादिंम गुलाम नबी कादरी, इरफान कादरी बार्शीचे निवासी नायब तहसीलदार माजिद भाई काजी तसेच करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक नसरुल्लाह खान ,एडवोकेट अलीम पठाण, सोलापूर जिल्हा शांतता समितीचे सदस्य आयुब शेख,साबीर अली खान, राजू खान, मुन्ना खान सर आदींनी सुफी हसनैन कादरी याचे विशेष अभिनंदन केले आहे.

litsbros

Comment here