…… आठवणींच्या पडद्याआड ……….

……… आठवणींच्या पडद्याआड ……….
**********************
अगदी तसं बघायला गेलं तर प्रत्येकच माणसाचा तो एक स्वभाव धर्म आहे म्हणजे त्यात स्त्री… पुरुष … आबालवृद्ध…सगळे कळत असलेलं वय झाल्यापासून पार सगळ्यांना आठवणारी एक गोष्ट म्हणजे आठवण ही सर्व भूतकाळातील एक अदृश्य मालमत्ताच म्हणावी लागेल काही वेळा माणूस त्यात एवढा हरवतो की आत्ताचं आपलं वय त्यातनं पहिले पाच सहा वर्ष वजा करायचे म्हणजे एकदम अल्लड बालपण झालं पण नंतरचा काळ म्हणजे आपल्या कायम मनाच्या पटलावर उमटलेला आता त्यात पण सुरुवातीचे दोन-चार वर्ष म्हणजे आठवण जराशी धूसर म्हणजे तळ्यात का मळ्यात अशी अवस्था असते
अन तल्लीन होऊन या जुन्या आठवणीमध्ये रमलं की सर्व इतिहास चल चित्रपटासारखा डोळ्यासमोरून जातो आणि पुन्हा नवीन स्मरण होतं कारण फक्त याच भांडवलावर आणि विचाराच्या पद्धतीने माझा हा 706 क्रमांकाचा लेख लिहून झालाय फक्त आपण मात्र एक करायचं त्या विचाराच्या भूमिकेशी समरस व्हायचं म्हणजे 50 वर्षांपूर्वीच्या पोमलवाडीच्या आठवडे बाजारात उन्हात फिरलेलो आपण ते डोळ्यापुढं दृश्य आणायचं आणि आता आपण या वयातपण पोमलवाडीच्याच बाजारात त्याच चौकामध्ये फिरतोय या भूमिकेशी एकरूप व्हायचं तसचं तवा दारात आलेला नंदी बैलवाला त्याला आपल्या दारात उभा आहे असं दृश्य समोर आणून आपणच नंदी बैलवाला आहोत ही भूमिका वठवायची आणि आठवण येणं अजून एक म्हणजे आठवण कशाला म्हणायची तर भूतकाळातील घडून गेलेल्या घटना या मानवाच्या बुद्धीमध्ये जतन होणं आणि वर्तमान मध्ये त्या अदृश्य स्वरूपामध्ये ताज्या किंवा जाग्या होणं हे झालं


थोडक्यात सांगायचं झालं तर मेंदू मधला केमिकल लोचा सांगतो जेव्हा न्यूरोन्सचे विशिष्ट गट पुन्हा सक्रिय केले जातात तेव्हा आठवणी जनरेट होतात म्हणजे आत्ताच्या भाषेमध्ये आपण म्हणतो याचं मेमरी कार्ड खूप जबरदस्त आणि स्ट्रॉंग आहे अगदी तसं कोणत्याही उत्तेजनाचा परिणाम न्युरोनल ऍक्टिव्हिटीच्या विशिष्ट पॅटर्नमध्ये होतो आता तसं बघितलं तर काही न्यूरोन्स प्रत्येक अधिक प्रमाणामध्ये विशिष्ट क्रमाने सक्रिय होतात न्यूरान्समधील कनेक्शन बदलून आठवणी साठवल्या जातात आणि आठवणी जतन करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे ती झोप तशातच काही आठवणी आता तसं बघितलं तर काही आठवणी सकारात्मक तर काही नकारात्मक असतात म्हणजे सुखी आणि दु:खी मन करणाऱ्या तर अशा काही जुन्या आठवणी परत परत येत असतील आणि ठीक आहे माणसाचं मन हे चंचल असतं कधी सैरभैर होतं भरकटल्यासारखं वाटतं अशावेळी सुखाच्या आठवणीमध्ये रमून जावं आणि दुःखी आठवण आली तर मन कुठेतरी दुसरीकडे विचलित करून रमवावं हा पर्याय सर्वात उत्तम आठवणीचं कसं आहे दृश्य जरी बुडालं तरी आठवणी बुडत नसतात प्रत्यक्षापेक्षा आठवणींचा सुगंध जास्त असतो
यामध्ये पहिलं म्हणजे मन खंबीर असावं लागतं आठवण झाली की लगेच दुसरीकडे त्याच गोष्टीचा आनंद घ्यावा मनाच्या कोपऱ्यात एका कोपऱ्यामध्ये कुठेतरी भूतकाळातील ती माहिती जशीच्या तशी साठवली जाते त्याला आपण थोडक्यात स्मृती म्हणू आता ही स्मृती दिवसागणित बदलत जाते दररोजच्या धकाधकीच्या जीवनामुळे कुठेतरी या आठवणी पैकी काही नष्ट होतात म्हणजे विसरतात तर काही तिथेच असतात या स्मृतीचा एक चांगला फायदा असा की आपल्याला हवं तेव्हा आपण त्यांना डोळ्यासमोर आणू शकतो आणि पाहूसुद्धा शकतो आपला मेंदू एवढा हुशार नसतो की मनात जे चाललंय ते वास्तविक आहे याबद्दल गणित करेल आणि जे मनात चाललंय त्याला प्रतिसाद द्यायला लागतो कारण आठवणी या भूतकाळातील असतात आणि या गोष्टीचा आपल्या मनावर प्रभाव म्हणजे त्यावेळेस जास्त पडला होता त्यामुळे लक्षात राहतात तसं बघितलं तर लहानपणी किंवा भूतकाळात आपण खूप भांडणं मारामाऱ्या केलेल्या असतात पण त्यातील काहीच अविस्मरणीय म्हणजे आठवणीत राहण्यासारख्या असतात


अन वरील या दोन गुणधर्माशिवाय आठवणी बनत नाहीत आठवण ही भविष्याबाबत नसते आपल्यावर जास्त प्रभाव पडला नाही तर ते मनात सुद्धा राहत नाही मनामध्ये ठरवून सुद्धा न विसरता येणारी सतत मनाला भुरळ घालणारी यालाच आठवण म्हणतात आपलं लक्ष नेहमी अभावाकडं म्हणजे त्रुटीकडे असतं जे आपल्याला आहे त्याकडे आपलं लक्ष नसतं जे अजून मिळालं नाही किंवा हातात नाही ते आपल्याला पाहिजे असतं आणि म्हणून आठवणीच अस्तित्व कायम राहतं माणसाला स्वतःच्या निश्चयावर विश्वास नक्कीच असतो पण तेवढीच अनिश्चितपणाची भीती पण वाटते माणूस स्वप्नांचं तुषार जरी उडवत असला तरी एक मन पदराआड तोंड लपवत असतो माणूस पण कधी कधी फार वेगळा वागताना दिसतो आपण चित्रविचित्र स्वप्नांची चित्र रंगवताना आपलं पात्र म्हणजे आपल्या ओंजळीचं माप तो विसरतो
मात्र ते भेटलं नाही तर ओंजळ किती भरली हे पाहण्याच्या ऐवजी ती रिकामी किती आहे याची त्याला काळजी असते म्हणजे मन समाधानी नसतं म्हणून माणसाला असलेल्या आनंदापेक्षा नसलेल्याची आठवण जास्त येते वाहत्या नदीला साद घालण्यातच सार्थकता आहे हे त्याला कधी कळतच नाही त्याला नसलेले जलबिंदू हवे असतात अशा वेळेला त्याला नदीचा मधुर खळखळ आवाज आवडत नाही त्याला हवा असतो तो एकांत…आकांत…शांत… करायला तर थोडक्यात आठवण म्हणजे खोल असलेल्या भावनांचं उफाळून पुन्हा वर येणं पुणे रेल्वे स्टेशनच्या दादरावरून राजाबहादूर मिल नाहीतर सोहराब हॉल दिसतो का ते बघणं म्हणजे वारंवार तेच पाहणं लक्ष्मी रोड वरून अफाट गर्दी मधून जाताना कोणी ओळखीचा चेहरा दिसतो का ते पाहणं किंवा ती एक आस मनी धरणं ही एक जिज्ञासा
आता जुन्या आठवणी म्हंजे सहानेवर चंदनाचं लाकूड उगळावं तसं वाटतं जेवढं उगळल तेवढा दाट सुगंध कारण हायस्कूलला असताना उत्तम साठे दुपारनंतर एक 100 पाणी उघडलेली वही घेऊन व्हरंड्यातून जाताना खिडकीमधनं बघितलं तर काय तो आनंद व्हायचा कारण उद्या सुट्टी आहे ही नोटीस पक्की असायची आणि मराठी शाळेत असताना जी मजा मधल्या सुट्टीत दप्तर घेऊन पळून जाण्यात होती ती मजा आज कशातच नाही कुठला आलाय ड्रेसिंग टेबल आणि तो कपाटाचा मोठा लठ्ठ आरसा…नाही कोणत्या कंपनीचा पावडरचा डबा… टिकलीच्या पाकिटापेक्षा कुंकवाचा करंडाच भारी होता… हातातील दोन गोठापेक्षा डझनभर बांगड्यांचा आवाज छान होता खरंचं माझ्या आईचा शृंगार भारी होता…तवा घड्याळ एकाकडेच असायचं पण वेळ मात्र प्रत्येकाकडे असायची… लहानपणी दुकानात गेल्यावर समोर दिसणाऱ्या बरणीमध्ये तोंडाला पाणी सुटणारे एकेक पदार्थ असायचे…पण खिशात छदाम नसायचा आता खिशात मावणार नाहीत एवढे पैसे आहेत पण ते सोनेरी दिवस नाही.

हेही वाचा – ** रेल्वे स्टेशन वर दीड तास **

** एक आठवण… वल्ली भेळ ** ~~~~~~~~~~~~~~~~

कोणाकडे पण फोन नव्हता तरीपण ठरलेल्या वेळेला ठरलेल्या जागेवर सगळे जमायचे आणि भेटायचे… आता फोन असून सुद्धा वेळेत भेटणं जमत नाही…झाडाला लागलेली बोरं पण आता वाट बघून स्वतःच गळून खाली पडतात…कारण ते ज्यांची वाट पहायचे ते बालपण आता मोबाईल बघतयं टी व्ही काय ट्रांजिस्टर सुद्धा असला तरी त्याला श्रीमंत समजलं जायचं…. भले तो कागदाचा जमाना होता…पत्रातल्या भावना दोन-चार महिने सहज टिकायच्या…पण आता आयुष्यभराच्या आठवणी फोन मध्ये एका सेकंदात बोटानी डिलीट होतात…परीक्षेला पेपरचे टेन्शन कमी पण कोणते सर सुपरवायझर म्हणून येतात याचे टेन्शन भारी… सणावाराला नातेवाईकांची वर्दळ असायची पुरणाच्या स्वयंपाकाला पण बरकत होती लोकं घरापेक्षा मनाच्या मोठ्या मनाला जास्त जपायचे… चुलीच्या धुरा सोबत प्रत्येक घरातून माणुसकीचे झरे वहायचे…नव्या साडीची घडी मोडायला बायका कोणाला तरी आवर्जून साडी द्यायच्या… पहिलं परातीतलं पीठ पावडर म्हणून अंगाला लावल्यावर आई लाटणं घेऊन यायची…आताची आई फोटो काढायसाठी मोबाईल घेऊन येती चला परत एकदा आठवणीच्या खळखळत्या प्रवाहात डुंबून जाऊया
*********************************** किरण बेंद्रे
पुणे
7218439002

karmalamadhanews24: