आषाढी एकादशी निमित्त श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केम येथील विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा उत्साहात संपन्न

आषाढी एकादशी निमित्त श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केम येथील विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा उत्साहात संपन्न

केम प्रतिनिधी  – दिनांक 16/07/2024 रोजी आषाढीवारी निमित्त श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केम मधील विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा उत्साहात संपन्न झाला.श्री माऊलीच्या पालखीचे पूजन आणि पुष्प अर्पण प्रशालेचे मुख्याध्यापक  कदम एस.बी सर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  वसंत तळेकर, उपाध्यक्ष वस्ताद गणेश तळेकर सर, सचिन रणशृंगारे यांनी केले.

विद्यार्थ्यांनी पारंपारिक पोशाखात केम परिसरात विठू नामाचा गजर करून वातावरणात चैतन्य निर्माण केले. विठ्ठल आणि रुक्माई, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन विद्यार्थिनी, वारकरी झालेले विद्यार्थी टाळ मृदंगाच्या साह्याने अभंग म्हणत केम परिसरातील नागरिकांची मने जिंकली. इयत्ता पाचवी ते दहावीआणि अकरावी, बारावी कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी रामकृष्ण हरी असा जयघोष करून भक्तिमय वातावरण निर्माण केले.

हेही वाचा – प्रशासनाने उजनी धरण परिसरातील वीजपूरवठा आठ तास करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा – युवानेते शंभूराजे जगताप-संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती 

कोरोनात आई बाबा गमावलेल्या बालकांना जगदीशब्द फाउंडेशनचा मदतीचा हात; सलग चौथ्या वर्षी केले शैक्षणिक साहित्याचे वाटप

या दिंडी मध्ये सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री वाघमारे के.एन सर यांनी उपस्थित पालकांचे आणि नागरिकांचे आभार मानले.

karmalamadhanews24: