आरोग्यदेश/विदेश

आता घरबसल्या मिळणार आपल्या परिसरातील कोरोना लसीची माहीती;केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केला व्हॉटसअप नंबर जारी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

आता घरबसल्या मिळणार आपल्या परिसरातील कोरोना लसीची माहीती;केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केला व्हॉटसअप नंबर जारी

देशात कोरोना लसीचा तुटवडा आहे.अनेक ठिकाणी लसीकरणाच्या वेळेस गर्दी झाल्याचे दिसून येते.यात सोशल डिस्टिसिंगचा फज्जा उडतो.लसीकरण करून घेण्याची इच्छा असून सुद्धा बूथ वर उडणारा गोंधळ, गर्दी यामुळे अनेकजण लसीकरणाकडे पाठ फिरवतात. हाच उडणारा गोंधळ टाळण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक मोबाईल नंबर जारी केला आहे.


आरोग्य मंत्रालयाकडून 9013151515 दिलेल्या या नंबरवरून घर बसल्या आपण कोरोना लसीची माहिती घेऊ शकतो.व्हॉट्सअॅपमध्ये या नंबरवर आपला पिन कोड टाकून फक्त सेंड करा.
त्यानंतर या परिसरात लसीकरणासंदर्भात काय स्थिती कशी याची संपूर्ण माहिती तुमच्या मोबाईलवर येईल.लसी साठी तुमची नोंदणी झालेली असेल तरीदेखील, या नंबर वरून तुमचा नंबर कधी येणार आहे आणि कधी लसीकरण करून घेता येऊ शकते.

हेही वाचा-पैसे कमवण्याचे अमिष दाखवून लूटणाऱ्या ‘या’ मोबाईल अ‍ॅपपासून सावध राहा, चुकूनही डाउनलोड करू नका

ग्रामीण भागातील कृषीविषयक दुकाने ‘या’ वेळेपर्यंत राहणार सुरू;जिल्ह्याधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश

याबाबत माहिती तुम्हाला घरबसल्या मिळू शकते.
यासाठी कोणत्याही व्यक्तीकडे जायची, चौकशी करण्याची, किंवा परिसरामध्ये इतर ठिकाणी जाऊन लोकांच्या संपर्कात येण्याची गरज आता भासणार नाही.लोकांना मदत म्हणून आणि लसीकरणा दरम्यान होणारा गोंधळ टाळण्यासाठी, आरोग्य मंत्रालयाकडून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

litsbros

Comment here