आमदार संजय मामा शिंदे यांच्या काळात करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यावर गुन्हे दाखल होणे दुर्दैवाचे; कुणी केला आरोप ? वाचा सविस्तर

आमदार संजय मामा शिंदे यांच्या काळात करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यावर गुन्हे दाखल होणे दुर्दैवाचे; कुणी केला आरोप ? वाचा सविस्तर

करमाळा (प्रतिनिधी);
टेलकडील गावाना पाणी मिळणे गरजेचे असून तो त्यांचा हक्क आहे परंतु हे करत असताना आमदार संजयमामा शिंदे यांच्या कालावधीत शेतकऱ्यावर गुन्हे दाखल होणे ही बाब दुर्दैवी आहे.दहिगाव उपसा सिंचन योजना चालवण्यासाठी विद्यमान आमदार पूर्णतः अपयशी ठरले असा हल्ला बोल आज पाटील गटाकडून प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केला.

तालुक्याच्या पूर्व भागातील गावात सध्या दहीगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन चालू आहे. काल पाण्याबाबतच्या तक्रारी वरून पोलिसात एका शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यावरून आज पाटील गटाकडून विद्यमान आमदार यांच्या कार्यप्रणाली वरून टीका करण्यात आली.

याबाबत अधिक सविस्तर बोलताना पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर म्हणाले की माजी आमदार नारायण पाटील यांच्या कालावधीत अनेकदा घोटी, वरकुटे, नेरले या टेलकडील गावास दहीगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन मधून मुबलक पाणी दिले गेले.अगदी वडशिवणे तलावात सुद्धा पाणी पोहचवले. त्यावेळी एकही शेतकऱ्यावर गुन्हा दाखल झाला नाही आणि कधी पोलीस व्हॅन कॅनॉल परिसरात फिरवून शेतकऱ्यामध्ये दहशत निर्माण केली नाही.

मग आज आमदार संजय शिंदे यांच्या काळातच हि वेळ का येत आहे? वास्तविक पाहता टेलकडील भागात पाणी पोहचवण्यासाठी दोन्ही पंप हाऊस मधील मोटारी पूर्ण क्षमतने चालू असणे गरजेचे आहे. दोन्ही पंप हाऊस मधील यंत्रणेस पूर्ण दाबाने वीजपुरवठा होणे गरजेचे आहे.

तरच पाणी वेगाने प्रवाहित होऊ शकते. तत्कालीन आमदार नारायण पाटील यांनी ह्या गोष्टी करून दाखवल्या त्यामुळेच जेंव्हा पाणी सोडले जात असताना कॅनॉल मधून ते वेगाने टेलकडे जात असत. यावेळी जर कॅनॉल मधील पाण्यात माणूस अथवा काही अडथळा आला तर तो पाण्याच्या प्रवाहा बरोबर वाहत होता.

इतका वेग त्यावेळी जवळपास निंभोरे गावापर्यंत कायम होता. त्यावेळी सुद्धा शेतकरी सायपन, मोटारी याद्वारे कॅनॉल मधून पाणी घेतच  होते. पण पूर्ण दाबाने व जादा क्युसेसने पाणी उपसले गेल्याने याचा जादा परिणाम मुख्य चारी वर होत नव्हता.

मग आजच ही वेळ का येत आहे याचा खुलासा विद्यमान आमदार महोदयांनी शेतकऱ्यांना द्यावा. स्वतःचे अपयश झाकण्यासाठी पोलीस बळाचा वापर करू नये. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन व समंजस पणाची भूमिका ठेवून टेल पर्यंत पाणी पोहोच करावे.

वास्तविता पाहता एखादी उपसा सिंचन योजना जर १०० टक्के काम पूर्ण होऊन कार्यान्वित झाली असेल तरच पाटबंधारे अधिनियम व कायदा याचा वापर संबंधित खात्यास करता येतो अशी आमची माहिती आहे.जर आमची माहिती चुकीची असेल तर संबधित खात्याने याबाबत माहिती द्यावी.

टेलकडे पाणी नेत असताना हेड कडील शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना सहकार्य करावे असे आव्हान आम्ही खुलेआम करत आहोत.

हेही वाचा – अभिनंदनीय; अखेर करमाळा तालुक्यातील ‘ही’ ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या प्रयत्नतून बिनविरोध; सर्वांनी आदर्श घेण्याची गरज!

सीना-माढा उपसासिंचन योजनेतून चार दिवसांत मोडनिंबला पाणी – आ.बबनदादा शिंदे मोडनिंब येथे विजयादशमीच्या मुहूर्तावर माढेश्वरी बँकेच्या नवव्या शाखेचा शुभारंभ

परंतु विद्यमान आमदार महोदयांनी शेतकऱ्यांना दुश्मन न समजता या योजनेचा खरा हक्कदार लाभार्थी आहे असे समजून त्याच्याशी वागणूक ठेवावी अन्यथा ज्यांच्या साठी ही योजना राबवली जात आहे त्या बळीराजाचा हा फार मोठा अपमान विद्यमान आमदार महोदय करत आहे असा आरोप तळेकर यांनी केला.

karmalamadhanews24: