आ.सुभाष देशमुख यांना बेदाणा उत्पादकांचे निवेदन ; शालेय पोषण आहारात त्वरित बेदाणा सुरू करण्याची मागणी शालेय शिक्षण मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचे दिले आश्वासन

आ.सुभाष देशमुख यांना बेदाणा उत्पादकांचे निवेदन ; शालेय पोषण आहारात त्वरित बेदाणा सुरू करण्याची मागणी

शालेय शिक्षण मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचे दिले आश्वासन

माढा / प्रतिनिधी -(राजेंद्र गुंड-पाटील)
राज्याचे माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख यांना माढा तालुक्यातील विविध गावांतील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी निवेदन दिले आहे.यामध्ये त्यांनी चालू महिन्यातच विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात बेदाण्याचे तातडीने वाटप सुरू करण्याची मागणी केली आहे.याबाबत आ.देशमुख यांनी सकारात्मकता दर्शवली असून लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्यासमवेत मिटिंग घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.

माढ्याचे आ.बबनराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माढा तालुक्यातील द्राक्ष व बेदाणा उत्पादनात अग्रेसर असलेल्या धानोरे देवी,मानेगाव, कापसेवाडी-हटकरवाडी,वडाचीवाडी (अं.उ),उंदरगाव आदी गावातील शेतकरी व बेदाणा उत्पादकांचे शिष्टमंडळ सोलापूर येथे आ.सुभाष देशमुख यांच्याकडे आवर्जून गेले होते.या शिष्टमंडळामध्ये धानोरे देवी येथील कृषी पर्यवेक्षक अनिल देशमुख,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष तानाजी देशमुख,कृषीनिष्ठ नितीन कापसे, प्रगतशील शेतकरी औदुंबर देशमुख,मार्तंड जगताप, प्रशांत चव्हाण,तानाजी मोटे,पप्पू जगताप यांच्यासह अनेक बेदाणा उत्पादक शेतकरी होते.

हेही वाचा – विठ्ठलवाडी येथे ठिकठिकाणी केरकचरा व प्लास्टिक पिशव्यांचे साम्राज्य स्वच्छतेसाठी सरसावली शाळकरी मुले ; विद्यार्थ्यांनी केली ग्रामस्वच्छता व साफसफाई

उजनी पाणलोट क्षेत्रातील केळी उत्पादक शेतकरी भरपाईच्या प्रतिक्षेत; मार्च एप्रिल महिन्यात सोळाशे एकरावरील केळीच्या बागा जमिनदोस्त

 मागील वर्षी बेदाण्याचे विक्रमी उत्पादन झाले आहे परंतु त्याची विक्री झाली नाही.काही प्रमाणात विक्री झाली आहे परंतु ती अत्यंत कमी व तुटपुंज्या दराने झाली आहे त्यामुळे शेतकरी चोहोबाजूंनी अडचणीत सापडला असून तो अक्षरशः हवालदिल झाला आहे.यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या उद्देशाने आ.बबनराव शिंदे यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून शालेय पोषण आहारात एक दिवस बेदाणा वाटप करण्यास मंजुरी मिळविली आहे परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नाही.ती चालू महिन्यातच सुरू झाल्यास शेतकऱ्यांना मदत व दिलासा मिळणार आहे त्यामुळे शासनाने हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा अशी मागणी धानोरे देवी येथील कृषी पर्यवेक्षक अनिल देशमुख व कृषीनिष्ठ नितीन कापसे यांनी केली आहे.

फोटो ओळी – सोलापूर येथे आ.सुभाष देशमुख यांना निवेदन देताना कृषी पर्यवेक्षक अनिल देशमुख,नितीन कापसे,तानाजी देशमुख व इतर शेतकरी.

karmalamadhanews24: