आमदार संजयमामा शिंदे यांच्या गाव भेट दौऱ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद…

आमदार संजयमामा शिंदे यांच्या गाव भेट दौऱ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद…

प्रतिनिधी
माढा लोकसभेचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आमदार संजयमामा शिंदे यांनी आज शनिवार दिनांक 27 एप्रिल रोजी करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागाच्या 22 गावांचा झंझावती प्रचार दौरा केला‌.या दौऱ्यास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या गावभेट दरम्यान आमदार शिंदे यांनी पारेवाडी,केतूर नं.1, केतुर नं.2, पोमलवाडी, खातगाव ,टाकळी, कोंढार चिंचोली, कात्रज, जिंती ,रामवाडी, कावळवाडी, भिलारवाडी ,कुंभारगाव , हिंगणी ,गुलमोहर वाडी, भगतवाडी, दिवेगव्हाण, सावडी, कोर्टी ,विहाळ, वीट या गावांना भेट देऊन गावाच्या विकासासाठी मतदारांनी महा इतीचे उमेदवार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना मतदान करण्याचे आवाहन केले.

हेही वाचा – लोकसभा आचारसंहितेमुळे जत्रा यात्रातील मनोरंजनात्मक कार्यक्रमांना ब्रेक, कलावंतांचे काय ?

‘जग बदलणारा बापमाणूस’ मराठी पुस्तकाचे अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात प्रकाशन; जगदीश ओहोळ यांच्या ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाची जगभर चर्चा !

सकाळी 8 वाजता पारेवाडी येथून या दौऱ्यास सुरुवात झाली व या दौऱ्याचा समारोप रात्री वीट येथे झाला. या गाव भेट दौऱ्यात आमदार संजयमामा शिंदे यांचे बरोबर पश्चिम भागातील सूर्यकांत पाटील, डॉ गोरख गुळवे, सुहास गलांडे ,एड.अजित विघ्ने, बाळकृष्ण सोनवणे, तानाजी झोळ, राजेंद्र धांडे, सुजित बागल, राजेंद्र बाबर, हनुमंत पाटील, शंकर जाधव ,बी एन जाधव, एड.अशोक गिरंजे ,अनिल शेजाळ, सरपंच पांडुरंग नवले, गणेश गुंडगिरी ,सरपंच अविनाश मोरे ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक औदुंबर मोरे, सरपंच गौरव झांजुर्णे ,रयत क्रांती जिल्हाध्यक्ष संतोष वारगड, अजित रणदिवे आदी उपस्थित होते.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line