आमदार गोपीचंद पडळकर बुधवारी करमाळ्यात!
करमाळा दि. 22 – बहुजन ह्दय सम्राट आमदार गोपीचंद पडळकर हे उध्या बुधवार दि. 23 एप्रिल रोजी करमाळा येथे येत असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रीशताब्दी जयंतीच्या निमित्ताने आयोजित ” धनगरी रूद्रनाद ” कार्यक्रमा बाबत अहिल्याप्रेमी जनतेशी संवाद साधणार आहेत. अहिल्याप्रेमी जनतेने बुधवारी सकाळी 10.30 वाजता जुने गेस्टहाउस, करमाळा येथे सकाळी उपस्थित रहावे असे आवाहन सकल धनगर समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची या वर्षी 300 वी जयंती आहे . सन 2025 या वर्षात महाराष्ट्र सह देशभर विविध कार्यक्रम संपन्न होत आहेत. दि 31 मे रोजी पंतप्रधान नरेन्द्र मोदी हे अहिल्या जन्मस्थळ चोंडी या ठिकाणी येत आहेत. अहिल्यादेवी होळकर यांच्या सन्मानार्थ पुढील आठवड्यात चोंडी येथे राज्य मंत्रिमंडळाची बैठक देखील येथे होत आहे. थोडक्यात शासनाच्या पातळीवर तसेच विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून त्रीशताब्दीचे भव्यदिव्य असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.
असाच एक कार्यक्रम “पुण्यश्लोक@ 300″ निमीत्ताने 50,000 ढोल वादनाचा विश्वविक्रम नोंदवणारा कार्यक्रम पुण्यात 15 मे रोजी आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमास केंद्रीय ग्रहमंत्री अमित शहा , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमात धनगर समाजाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवींना अभिवादन करताना आदीम धनगरी संस्कृतीचे दर्शन जगभरातील जनतेला घडविण्यासाठी पन्नास हजार धनगरी ढोल वादनाचा ” धनगरी रूद्रनाद ” हा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होत आहे. या कार्यक्रमात राज्यभरातील अहिल्याप्रेमी जनतेचा उस्फूर्त सहभाग वाढविण्यासाठी व या कार्यक्रमाची रूपरेखा लोकांना सांगण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर हे राज्यभर दौरा करत आहेत.
शहिदांची स्मृती जपणे ही आपली नैतिक जबाबदारी: ॲड. बाळासाहेब मुटके
या दौर्यादरम्यान पडळकर करमाळा येथे संवाद साधून सहभाग वाढविण्यासाठी , नियोजनाबद्दल माहीती देण्यासाठी करमाळा येथे उध्या बुधवारी सकाळी 11 वाजता करमाळा येथे येत आहेत.
तरी करमाळा तालुक्यातील अहिल्याप्रेमी नागरिकांनी जुने गेस्ट हाऊस, कोर्टाशेजारी,करमाळा येथे बहुसंख्येने सकाळी 10.30 वाजता हजर रहावे असे आवाहन करमाळा तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.