आजी माजी सैनिक संघटनेकडून शहीद जवान बागल यांना आदरांजली अर्पण

आजी माजी सैनिक संघटनेकडून शहीद जवान बागल यांना आदरांजली अर्पण

केत्तूर (अभय माने ) झरे (ता. करमाळा) येथे शहीद जवान नायब सुभेदार ज्ञानेश्वर बागल यांच्या प्रथम स्मृतीदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त करमाळा तालुका आजी माजी सैनिक संघटनेकडून आदरांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी करमाळा तालुका आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष मेजर अक्रुर शिंदे, उपाध्यक्ष मेजर रविंद्र सव्वासे, शिवाजी भंडारे,सुरेश आदलींग, सुभाष मुटके,अशोक शिंदे, कल्याण कदम, बागल, या सर्व माजी सैनिक अधिकाऱ्यांनी शहीद जवान बागल यांना अभिवादन केले.

या प्रसंगी करमाळा तालुक्यातून अनेक सामाजीक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी आदरांजली वाहिली यामध्ये प्रामुख्याने जेष्ठ नेते विलासराव घुमरे,जेऊरचे सरपंच पृथ्वीराज नारायण पाटील, यांनी आदरांजली अर्पण केली. यावेळी प्रा.बिले , प्रा. मिलिंद फंड सर,संगीत विशारद बाळासाहेब नरारे सर, शहीद जवान यांचे वडिल .बापूराव बागल उपस्थित होते.

हेही वाचा – कुंभेज येथील तरुणाचे यश, महाराष्ट्रातून पाचवा क्रमांक मिळवत पोलीस उपनिरीक्षकपदी निवड

उन्हाचा चटका! बाजारात रसदार , थंडगार फळांना मागणी वाढली!

सैनिक संघटनेचे अध्यक्ष मेजर अक्रुर शिंदे यांनी शहीद जवान ज्ञानेश्वर बागल यांचे झरे येथे स्मारक व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करून करमाळा तालुका आजी माजी सैनिक संघटना यासाठी पाठपुरावा करील असे आश्वासन दिले. याप्रसंगी ह.भ.प. वारंगे महाराज यांचे हरी कीर्तन संपन्न झाले. यावेळी बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line