आगळावेगळा वृक्षारोपण कार्यक्रम,दिग्गजांची उपस्थिती;दादाश्री फाउंडेशनचा उपक्रम

आगळावेगळा वृक्षारोपण कार्यक्रम,दिग्गजांची उपस्थिती;दादाश्री फाउंडेशनचा उपक्रम

केत्तूर (अभय माने) डॉ.एस.पी.बालसुब्रमण्यम, कैलास खेर,जावेद अली,आनंद शिंदे,आदर्श शिंदे,वैशाली माडे,वैशाली सामंत सारख्या अनेक दिग्गज गायिका बरोबर काम करणारे त्यांच्या गाण्याला स्वतःचे संगीत देणारे.अनुराधा पौडवाल,मीनाक्षी शेषाद्री,ना.धो.महानोर,सोनू निगम आदी प्रतिष्ठित मान्यवरांनी ज्यांच्या गाण्याचे कौतुक केले आहे असे 14 मराठी मराठी चित्रपटाला संगीत देणारे व स्वतःची 18 अल्बम प्रसारित करणारे स्वतःचे 1000 म्युझिक शो करणारे एकदा गाणं प्रसारमाध्यमात टाकल्यावर एका तासात पाच लाखापेक्षा जास्त व्ह्यू घेणारे दिग्गज गायक आदर्श संगीतकार गीतकार हर्षित अभिराज हे एका छोट्या सामान्य दादाश्री फाउंडेशनचे अध्यक्ष काकासाहेब गायकवाड यांच्या विनंतीला मान देऊन करमाळा तालुक्यातील टाकळी येथे वृक्षारोपण कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होते.

त्यांनी विनंतीला मान देऊन गाणेही सादर केले कित्येक रुपये खर्च करूनही कधी कधी तिकीट भेटत नाही परंतु त्यांना लाईव्ह ऐकण्याचे भाग्य टाकळी व परिसरातील ग्रामस्थांना लाभले.

वृक्षारोपण कार्यक्रमाच्या वेळी ग्रेट म्युझिशियन हर्षित अभिराज सर,तहसीलदार करमाळा शिल्पा ठोकडे ,ज्येष्ठ कवी हनुमंतजी चांदगुडे,कर्चे ,महावीर गोरे व माधव जाधव आदी उपस्थित होते.याबरोबरच प्रसिद्ध कवी गीतकार सह्याद्री देवराईचे टायटल सॉंग चे निर्माते इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकात स्वतःची कविता असणारे साहित्यिक मा.श्री.हनुमंत चांदगुडे यांनीही आमच्या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी उपस्थित दर्शविली.झाडाविषयी कविता करून अनेकांना वृक्षारोपन करण्यास प्रवृत्त केलेत्याबद्दल त्यांचेही मनःपूर्वक आभार मानले.कृष्णाई इंटरनॅशनल स्कूल कात्रज येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याच बरोबर विवीध दाखले शिबीराचे ही आयोजन करण्यात आले होते .

 

हेही वाचा – जयंती विशेष लेख | साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे: बंडखोर आणि परिवर्तनाची बीजं पेरणारा साहित्यिक!

सापटणे भोसे येथील सुषमा हनुमंत राऊत हिची जलसंपदा विभाग कॅनॉल निरीक्षक (INSPECTOR) पदी निवड

डोमासाईल ,जातीचे दाखले , उत्पानाचे दाखले तेथे देण्यात आले..कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कृष्णाई इंटरनॅशनल स्कूल सर्व शिक्षक बांधवांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे निमंत्रण जिंती मंडल अधिकारी गोसावी साहेब व दादाश्री फाउंडेशनचे काका काकडे सर्वांचे आभार मानले.

karmalamadhanews24: