आदिनाथ साखर कारखान्यातील चोरीचा तपास करा; गुन्हा नोंद झाला पण कुणालाच अटक नाही!

आदिनाथ साखर कारखान्यातील चोरीचा तपास करा; गुन्हा नोंद झाला पण कुणालाच अटक नाही!

करमाळा (प्रतिनिधी);
आदिनाथ सहकारी साखर कारखान्यांमधून 9 सप्टेंबर 2020 रोजी कारखान्याच्या स्टोर मधून लाख रुपयाचे सामान चोरीला गेले होते याची करमाळा पोलीस ठाण्यात नोंदवून गुन्हा दाखल झालेला आहे.

तर या प्रकरणाचा त्या तपास झालेला नाही व आरोपींना अटक केलेली नाही.या प्रकरणाचा तपास व्हावा म्हणून पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांच्याकडे लेखी निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की प्रत्यक्षात या कारखान्याच्या स्टोर मधून 30 ते 35 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची शंका आहे या चोरीच्या सहभागात कारखान्यातील काही कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.

याप्रकरणी करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे तरी या प्रकरणात चोरी झालेल्या मागील व पुढील दहा दिवसांच्या काळात काळात असलेल्या सर्व वॉचमनचे जबाब घेण्यात यावी
तसेच या प्रकरणात तत्कालीन संचालकांचेही म्हणणे लेखी किंवा तोंडी स्वरूपात पोलिसांनी नोंदवून घ्यावे

अशाच प्रकारे गेली तीन ते चार वर्षात अनेक वस्तू भंगारचे सामान आदिनाथ कारखान्यावर चोरून गेलेले आहेत या चोरीचा तपास लागला तर अनेक चोऱ्या उघडकीस येणार आहेत

निवेदनात म्हटले आहे.निवेदनाच्या प्रती गृहमंत्री देवेंद्र फडवणीस तसेच जिल्हा पोलीस प्रमुख शिरीष देशपांडे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्यात आले आहे.

हेही वाचा – सोलापूर जिल्ह्यात करणार १ लाख ११ हजार १११ रोपांचे वृक्षारोपण, IAS बालाजी मंजुळे यांच्या हस्ते पोंधवडी येथे झाला शुभारंभ; दादाश्री फाउंडेशनचा उपक्रम

केंद्र सरकारकडून महिलांना 6000 रुपये, लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा? कोणती कागदपत्रे लागतील? वाचा सविस्तर माहिती

या चोरीच्या प्रकरणात आदिनाथ कारखान्याचा एखादा कर्मचारी माफीचा साक्षीदार झाला तर व त्यांनी खरे गुन्हेगारांची नावे पोलिसांना सांगितले तर अशा कर्मचाऱ्यांचा प्रशासक मंडळाच्या वतीने जाहीर सत्कार करून त्याला अकरा हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईलअशी घोषणा प्रशासकीय संचालक महेश चिवटे व संजय गुटाळ यांनी केली आहे.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line