आदिनाथ कारखान्यातील बेकायदेशीर भंगार मालाची विक्री निविदा रद्द करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी.

आदिनाथ कारखान्यातील बेकायदेशीर भंगार मालाची विक्री निविदा रद्द करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी.
प्रतिनिधी करमाळा.
आदिनाथ सहकारी साखर कारखाना प्रशासनाने सद्या भंगार मालाची विक्री निविदा काढली असून ही निविदा प्रक्रिया पूर्ण पणे बेकायदेशीर आहे.त्यामुळे ही प्रक्रिया तात्काळ रद्द करुन या पूर्वी ही बेकायदेशीर रीत्या भंगार म्हणून ट्रक व ट्रॅक्टरची केलेली विक्री याची ही चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी भाळवणी ता.करमाळा येथील रामचंद्र शिंदे यांनी साखर आयुक्त पुणे यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे

शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की २९/१२/२०२३ रोजी करमाळ्यातील स्थानिक साप्ताहिकामध्ये भंगार
मालाची (स्क्रॅप) विक्रीचे निविदा प्रसिद्ध केली आहे.सदर निविदा
जिल्ह्यातील जास्त वितरण होणाऱ्या दैनिक वर्तमान पत्रामध्ये प्रसिद्ध करणे
गरजेचे असताना फक्त करमाळा तालुक्यात आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिकात प्रसिद्ध केल्या आहेत त्यामुळे जास्तीत जास्त ठेकेदारांना महिती
मिळू नये व मर्जीतील लोकांना टेंडर देता यावे हा हेतू स्पष्ट होत आहे.

सदर प्रसिद्धीकरणात मालाची पाहणी करण्यासाठी दि. ५ व ६ जानेवारी ची मुदत दिली आहे व ७ जानेवारी रोजी ई-लिलावा‌द्वारे मालाची विक्री केली जाणार आहे.असे म्हटले आहे. मालाची पाहणी नंतर टेंडरमध्ये सहभाग घेण्यास योग्य ती मुदत दिली नसल्यामुळे भंगार मालाची विक्री करावी.तसेच आदिनाथ सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर देखील निवडणूकी साठी लागणारी रक्कम न भरल्यामुळे कारखाना संचालक मंडळ बरखास्त करून निवडणूक घेण्यासाठी प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती.

हेही वाचा – ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तक खा. शरद पवार यांच्या हाती; लेखक जगदीश ओहोळ यांनी घेतली शरद पवार यांची भेट

कुस्तीमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल माजी आमदार नारायण आबा पाटील यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान निमगाव केतकी येथील ग्रामस्थांनी दिला पुरस्कार

प्रशासकांची नियुक्ती ही एकमेव निवडणूक घेण्याच्या उद्देशानेच केली आहे.तरीही निवडणूक न घेता हंगाम चालू करण्याचे धाडस केले असून सध्या केवळ तीन हजार टन उसाचे गाळप करुन १६० क्विंटल खराब साखरेचे उत्पादन केले आहे.अजूनही गाळपा अभावी १५०० टन ऊस गव्हाची भोवती पडून आहे.परिणामी कारखान्याचे करोडो रुपयांचे अर्थिक नुकसान होत आहे.त्यामुळे दोषींवर योग्य कारवाई करुन निवडणूक घेणे आवश्यक आहे

karmalamadhanews24: