पावसाळ्यातही उकाडा कायम; नागरिक हैराण!
केत्तूर (अभय माने) करमाळा तालुक्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात केत्तूर परिसरात सलग 10/12 दिवस मध्यम स्वरूपाच्या मान्सूनपूरर्व पावसाने हजेरी लावल्यानंतर अजूनही ब्रेक के बाद पाऊस होत असला तरी, हवेत मोठ्या प्रमाणावर दमटपणा असल्याने उन्हाळ्याप्रमाणेच उकाडा मात्र कायम आहे. पाऊस सुरू असताना मात्र गारवा व नंतर उष्णतेचा उकाडा जाणवत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. सध्या पावसाळा चालू आहे की उन्हाळा ? हेच कळेनासे झाले आहे.
करमाळा तालुक्यातील ‘या’ भागात ड्रोनच्या घिरट्या: नागरिकांत भीतीचे वातावरण!
पाऊस उघडल्यानंतर सूर्य तळपत आहे. मान्सूनपूर्व पाऊस झाला असला तरी, आता मात्र मान्सून गेला कुठे ? असा प्रश्न शेतकरी विचारीत आहेत.
ब्रेक के बाद मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावत असल्याने हा पाऊस ऊस पिकासाठी फायदेशीर ठरत आहे मात्र खरीप पेरणीसाठी वापसा होत नसल्याने शेतकरी या पावसामुळे हतबल झाले आहेत.