करमाळा शेती - व्यापार सोलापूर जिल्हा

केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करणार; आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते शेतकऱ्यांचा सन्मान!

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करणार; आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते शेतकऱ्यांचा सन्मान!

जेऊर (प्रतिनिधी- अलीम शेख); केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण शासकीय पातळीवर प्रयत्नशील असून सोलापूर जिल्ह्यातील शेलगाव केळी संशोधन केंद्रासह विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करत असल्याचे प्रतिपादन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी कंदर तालुका करमाळा येथे महाराष्ट्र केळी उत्पादक शेतकरी संघाच्या केळी परिषदेच्या उद्घाटन व केळी रत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष अतुलनाना माने- पाटील होते.

पुढे बोलताना मोहिते पाटील म्हणाले की देशात केळी निर्यातीमध्ये महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे यामध्ये सोलापूर जिल्ह्याचा हिस्सा 57% असून केळी उत्पादकांपुढे सध्या असलेल्या विविध समस्या सोडवण्यासाठी आपण शासन दरबारी प्रयत्नशील आहे.केंद्र शासनाच्या केळी उत्पादन करणाऱ्या जिल्ह्यांच्या सुचीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे नाव नाही या सुचीमध्ये सोलापूर जिल्ह्याचा समावेश केला पाहिजे .

शेतकऱ्यांना फायदेशीर असलेली किसान रेल सुरू झाली पाहिजे, सोलापूर जिल्ह्यातील शेलगाव येथील केळी संशोधन केंद्र असो अथवा केळी पिकाचा भाऊसाहेब फुंडकर योजनेत समावेश करण्याची मागणी असो केळी उत्पादक संघाच्या वतीने करण्यात आलेल्या विविध मागण्या सोडवण्यासाठी आपण शासन स्तरावर पाठपुरावा सुरू असून या संबंधीत खात्याचे मंत्री व अधिकारी यांचे सोबत बैठक घेऊन सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक केळी उत्पादन संघाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांनी केले उपस्थितांचे स्वागत.

तालुका अध्यक्ष वैभव पोळ,सागर रणदिवे, अभिजीत भांगे एकनाथ कोरके, संतोष उपासे, केशव गायकवाड यांनी केले यानंतर केळी उत्पादक संघाचे संस्थापक अध्यक्ष किरण चव्हाण यांनी केळी उत्पादकांसमोर असलेल्या समस्या मांडल्या यावेळी केळी पिकासाठी 2340 रूपये हमीभाव मिळाला पाहिजे , पोषण आहारात आठवड्यातून दोन दिवस केळीचा समावेश करावा,केळी पिकाला नुकसान भरपाई हेक्टरी नव्वद हजार रुपये करावी , भाऊसाहेब फुंडकर योजनेत केळीचा समावेश करावा फळ म्हणून मान्यता मिळावी,आदि मागण्या त्यांनी मांडल्या यानंतर महाराष्ट्रातील विक्रमी उत्पादन घेणाऱ्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना केले रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला मापदाचे अध्यक्ष विनोद तराळ केळी उत्पादक संघाचे उपाध्यक्ष राहुल बच्छाव पाटील सचिव अतुल पाटील सचिन गांगर्डे सचिन कोरके नामदेव वालेकर जिल्हा परिषद सदस्य सवितादेवी राजे भोसले, संजय पाटील,भारत पाटील, प्रमोद कुटे, अजित तळेकर, दिपक देशमुख,अमर साळूंके सरपंच मौला मुलाणी इंगळे हनुमंत चिकणे संजय रोंगे राजेश नवाल पुरुषोत्तम सर्जे,किरण पाटील यांच्यासह त्यातील विविध जिल्ह्यातील केले उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा – करमाळा तालुक्यात हिवरे, हिसरे,कोळगाव,सौंदे, भागात वादळी वा-याचा धुमाकूळ; तीन जनावरांचा विज पडून मृत्यू , लाखो रुपयांचे नुकसान: केळी बागा भुईसपाट

करमाळा नगरपरिषदेने पावसाळ्यापूर्वी ओढे, नाले साफसफाई करावी; माजी नगरसेविका बानू फारुक जमादार यांची मागणी

यावेळी केळीचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या महाराष्ट्रच्या विविध तालुक्यातील या शेतकऱ्यांना‌ केळी रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

वसंतराव येवले- पाटील ( माढा) राजेंद्र पाटील (भडगाव) भुषण पाटील (जळगाव) अशोक पाटील (पिंपळगाव पाचोरा) गणेश खोचरे(कन्हेरगाव माढा) रणजीत पवार (कळंब धाराशिव)भिला पाटील (भडगाव जळगाव) सचिन राखुंडे (बाभूळगाव इंदापूर ) अविनाश सरडे (चिखलठाण करमाळा) पांडुरंग खबाले (वाशी) रमेश पाटील (कोळगाव) शिवदास पाटील (जामनेर) अभिजित भांगे (कंदर) विशाल शिरवत (पैठण) विजय पाटील (जामनेर)सुमीत पाटील (पारोळा) दिनकर जायले (अकोट) भुषण पाटील (जळगाव) विनोद बोरसे ( जळगाव)प्रकाश नेहते (रावल) योगेश पवार (चाळीसगाव) गोपीनाथ फडतरे(वाशी धाराशिव) चंद्रप्रकाश राऊत (अकोला)हानुमंत शितोळे (पंढरपूर)
नानाजी बच्छाव केळीविकासरत्न पुरस्कार दिपक कदम (सांगवी पंढरपूर) संभाजीराव कदम आदर्श कृषी पत्रकार पुरस्कार भगवान हिरे (नांदगाव नाशिक)यांना प्रदान करण्यात आला.

litsbros

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!